खून लुटमारीच्या उद्देशाने झाला की…
मात्र, हा खून लुटमारीच्या उद्देशाने झाला असल्याचा शहर पोलिसांचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या ‘एनआयए’च्या पथकाने सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्यातून प्रकरणाबाबत चौकशी केली नंतर घटनास्थळीसुद्धा पाहणी केली. तसेच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचीसुद्धा झाडाझडती घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल
भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांची चौकशीची मागणी…
उमेश कोल्हे यांचा खून लूटमारीसाठी झाला असल्याचे निदर्शनास येत नाही. आरोपींनी लुटण्यासाठी चाकू मारला असता तर सोबतचे सामान, पैसे ते घेऊन पळाले असते. शिवाय, या खून प्रकरणात पकडलेले आरोपी यापूर्वी कुख्यात म्हणून प्रसिद्ध नाहीत. रुपये लुटण्यासाठी उमेश कोल्हे दिसताक्षणी मोठा चायनीज चाकू त्यांच्या गळ्यात खुपसण्याऐवजी धाक दाखवून पैसे पळवण्याचा प्रयत्न झाला असता. हा खून नूपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहे का? हे पडताळण्यासाठी ‘एनआयए’ने तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती.