नंदुरबार : महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्याकडे जाणारा कंटेनर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये असं काही सापडलं की पोलिसही हैराण आहेत. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. मात्र, या कारवाईत कंटेनर वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुकातून गुजरात राज्याकडे अवैध दारू नेली जात होती. तिची विक्रीही केली जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याची वाहतूक ही पर राज्यातून महाराष्ट्र राज्यात ते नवापूर मार्गे गुजरात राज्यात केली जाते यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नेहमीच दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.

हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

नंदुरबार जिल्ह्यालगत दोन राज्यांची सीमा जोडली गेली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या अवघ्या काही किलोमीटरवर गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. या ठिकाणावरून नेहमीच अवैध मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाकडून कारवाई केल्या जातात. मात्र, मोठ्या करवाईकडे पथकाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते.

नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हेची निर्घृण हत्या? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण…
धुळे जिल्ह्यातील साक्रीकडून येत असलेल्या एका कंटेनर वाहनात अवैधरीत्या दारू साठा गुजरात राज्यात जाणार असल्याची गुप्त माहिती नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर पाटील यांना मिळाली. यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार एल.सी.बीच्या पथकाने सापळा रचून धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील अ‌ॅपल हॉटेलसमोर साक्रीहून सुरतकडे जाणाऱ्या कंटेनरची तपासणी केली. यावेळी कंटेनरमध्ये अवैधरीत्या वाहतूक होणारा ४३ लाखांचा विदेशी बनावट दारू साठा मिळून आला. या कारवाईत कंटेनर वाहन चालकसह सहचालक घटनास्थळावरून पसार झाले आहे.

धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर जी.जे.०६ ए.झेड.३५६० या क्रमांकाच्या कंटेनर वाहनांतून विदेशी बनावट रॉयल विस्की बॉक्स एकूण जवळपास ४३ लाखांचा मद्यसाठा नंदुरबार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. पर राज्यातून महाराष्ट्र मार्गे गुजरात राज्यात अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर वाहनांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

बापरे! किल्ले रायगडच्या पायथ्याशी गावातील डोंगराला मोठी भेग, नागरिकांचं स्थलांतरण सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here