मुंबई : शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून पहिला वार केला आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. पुन्हा एकदा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असे सांगितले जात आहे. पण हा तसा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला (Shivsena) बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या याच आक्रमक वक्तव्याला नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेतील विरोधाभास अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी हे नवे सरकार स्थापन केले त्यांनी त्यांच्यातील तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. मग हीच गोष्ट मी अडीच वर्षांपूर्वी अमित शाह यांना बोललो होतो. तेव्हाच जर भाजप पक्ष यासाठी राजी झाला असता तर सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या असत्या. असं सांगत हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यावर बंडखोर गटातून तसेच खुद्द नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हेत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पहिला वार
योग्य वेळी उद्धव ठाकरेंना उत्तर देईन : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. यावेळी निवेदकाने विविध विषयांवर त्यांची मते जाणून घेतली. शिंदे सरकारच्या अजेंड्यावर येणाऱ्या काळात कोणते विषय असतील, कोणत्या विषयांना प्राधान्य असेल, असे प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर त्यांनी एकनाथ शिंदेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी योग्य वेळी मी उद्धव ठाकरे यांना उत्तर देईल, असं ते म्हणाले. तसेच मातोश्रीवर कधी जाणार? असाही प्रश्न वृत्तनिवेदकाने त्यांना विचारला. या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. योग्य वेळ आली की मातोश्रीवर जाईन. तुम्हाला कळेलच, असं शिंदे म्हणाले.

Eknath Shinde: मातोश्रीवर कधी जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर; वेळ सांगितली
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

ज्यांनी हे नवे सरकार स्थापन केले त्यांनी त्यांच्यातील तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. मग हीच गोष्ट मी अडीच वर्षांपूर्वी अमित शाह यांना बोललो होतो. तेव्हाच जर भाजप पक्ष यासाठी राजी झाला असता तर सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या असत्या. असं सांगत हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही. शिवसेना आणि भाजप २०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढले होते. मग तेव्हा हेच ठरलं होतं, तर मध्ये तुम्ही मला मुख्यमंत्री कशाला बनायला लावलं? आता भाजपसोबत गेलेल्यांनी हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांना शब्द मोडला, आपल्या पाठीत वार केला, हे आता भाजपसोबत गेलेल्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे उद्धव ठाकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिशेने होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here