‘ब्रेस्टवर मारलं, माझा विनयभंग होत होता…’ केतकीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं
काय म्हणाली सुश्मिता
सुश्मिता सेन हिनं मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. त्यामुळे तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे होत होती. परंतु अभिनयाबाबत ती अगदीच नवखी होती. तिच्या सौंदर्याची चर्चा होत असल्यानं मनोरंजन विश्वाची दारं ही आपसूक खुली झाली होती. तिला सिनेमात काम करण्यासाठी विचारणा होत होती. परंतु सुश्मितानं मात्र मनोरंजन विश्वामध्ये पदार्पणासाठी महेश भट्ट दिग्दर्शित करत असलेल्या दस्तक सिनेमाची निवड केली. सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली तेव्हा ती हळूहळू अभिनय कसा करायचा हे शिकत होती. परंतु त्या दिवशी दस्तकच्या सेटवर जे काही झालं ते अजूनही सुश्मिता विसरलेली नाही.
महेश भट्टनं केला होता अपमान
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये Sushmita Sen नं त्या घटनेचा खुलासा केला होता. त्या घटनेमुळे सुश्मिता अतिशय निराश झाली होती. इतकंच नाही तर सिनेमातून बाहेर पडण्याचाही तिनं विचार केला होता.
वन- नाइट स्टँडनंतर अभिनेत्री झाली गरोदर, अबॉर्शन करण्याची आली वेळ
महेश भट्ट झाले होते नाराज
ट्विंकलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुश्मितानं सांगितलं की, ‘महेश अत्यंत उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्या सिनेमातील एक सीन मला चांगल्यापद्धतीनं सादर करता येत नव्हता. त्या सीनमध्ये मला कानातले काढून जोरानं फेकत माझा राग दाखवायचा होता. परंतु तो राग मी दाखवू शकत नव्हते. त्यामुळे महेश माझ्यावर खूपच नाराज झाले होते.’

सर्वांसमोर सुश्मितावर भडकले महेश
सुश्मितानं पुढं सांगितलं की, ‘त्यामुळे महेश खूपच नाराज झाले होते. सेटवर त्यावेळी मीडियामधील ४० जण आणि २० प्रॉडक्शनवाले तिथं होते. त्या सर्वांसमोर ते माझ्यावर खूप भडकले आणि माझा अपमान केला. हिला कणी इथं आणलं आहे…असं रागानं ते म्हणाले.’
मला अभिनय येत नव्हता
‘महेश भडकल्यामुळे मला रडू कोसळले. त्यांना म्हटलं की, मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की मला अभिनय येत नाही. तरी देखील तुम्ही मला फोन करून बोलावलं. मला माहिती नाही अभिनय कसा करायचा,’ असं सुश्मितानं सांगितलं.

महेश यांच्या वागण्यामुळे अभिनेत्री झाली नाराज
सुश्मितानं मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं का,’महेश यांच्या या वागण्यामुळे मला खूप राग आला होता. मी सेटवरून निघू जाऊ लागली. मी त्यांना म्हटलं देखील तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीनं बोलू शकत नाही.’
महेशनं पकडला सुश्मिताचा हात
सुश्मिता सेनचा हा राग पाहून महेश यांनी तिला सांगितलं की, हा असा राग हवा. असाच राग त्या सीनमध्ये मला हवा आहे, असं म्हणत त्यांनी सुश्मिताचा हात पकडला आणि तिला जाण्यापासून थांबवलं आणि तिला सांगितलं की, या सगळ्या गोष्टी तू आता कॅमेऱ्यासमोर जाऊन कर…’
कानाला झाली दुखापत
महेशनं सांगितलेली गोष्ट सुश्मिता नेमकी कळली. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर जाऊन तिनं तो सीन केला. हा कॅमेऱ्यासमोर हा सीन करताना सुश्मितानं इतका राग दाखवला की कानातले काढताना तिचा कान फाटला आणि त्यातून रक्त येऊ लागले.
दरम्यान सुश्मिता सेननं महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिनं बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिनं बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या ती वेब सीरिज ‘आर्या’च्या आगामी सीझनची तयारी करत आहे. याआधी या या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.