वाढदिवसानिमित्ताने जवळपास ६०० ते ७०० पाहुण्यांना बोलावण्यात आले
सोलापूर जिल्ह्यातील त्यांचे मित्र मंडळ वैष्णवीच्या वाढदिवसाला आले होते. वाढदिवसानिमित्ताने जवळपास ६०० ते ७०० पाहुण्यांना बोलावण्यात आले होते व गोडधोड जेवणाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. या अनोख्या वाढदिवसाची चर्चा मात्र जिल्हाभरात होत आहे. वैष्णवीच्या वाढदिवसाचे बॅनर देखील लावण्यात आले होते. बेंगाळ हे १९९८ पासून अश्वप्रेमी आहेत. त्यांच्याकडे आता चार घोड्या आहेत. वैष्णवी हिची किंमत तब्बल ५ लाख रुपये आहे. ह्या घोडीची लग्नाची सुपारी ते ११ हजार घेतात दुसरी घोडी सोनी नावाची आहे. तिची किंमत ४ लाख आहे. तिची सुपारी ते ९ हजार रूपये एवढी घेतात. त्यानंतर त्यांच्याकडे आर्ची आणि राधा नावाचे दोन घोड्या आहेत. त्यांची सुपारी ते ७ हजार ते ५ हजार घेतात तब्बल १४ लाख रुपये देऊन त्यांनी ह्या चार घोड्या खरेदी केल्या आहेत.
या घोड्या एका वर्षाला त्यांना सुमारे १० लाख रुपये कमवून देतात आणि त्यांच्या चारा, पाण्यासाठी ते तब्बल ३ ते ४ लाख रुपये खर्च करतात. बेंगाळ यांच्याकडे २० एकर शेती असून ते दोन भाऊ आहेत. ते बैलगाडा शर्यत पण खेळतात त्यांच्या कडे सुप्रसिद्ध बादशहा आणि अर्जुन या नावाची बैल जोडी देखील आहे. चालू काळात या जोडीने हिंगोली जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. अर्जुन आणि बादशहाचा चाहता वर्ग देखील भरपूर आहे.