बीड : बीडमध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी बीडकरांनी तुफान गर्दी केली. याच गर्दीत बैल उधळल्याने दोन शाळकरी मुलं गंभीररित्या जखमी झाले आहेत. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या तळेगाव शिवारात ही बैलगाडा शर्यत आयोजित केली होती आणि हीच शर्यत पाहण्यासाठी सकाळपासूनच बीडकरांची तुफान गर्दी झाली. ही शर्यत सुरू असतानाच एक बैलगाडा थेट गर्दीत घुसला आणि यामध्ये दोन शाळकरी मुलं बैलगाड्या खाली आले. या बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी होती का नाही? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, या आयोजकांवर कारवाईची मागणी केली जाते.

महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई; गुजरातला निघालेला कंटेनर अडवला आणि उघडताच फुटला घाम

मुलींचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून दस्तुरखुद्द डॉक्टर प्रीतम मुंडे यादेखील हजर होत्या. मात्र, जोपर्यंत त्या हजर होत्या तोपर्यंत एकाच फेरीचे स्पर्धा दर्शन झाले. मात्र, ते गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या फेरीत अचानक बैलगाडा बैलांसह उधळला आणि सरळ जाऊन गर्दीमध्ये घुसला. यामध्ये दोन शाळकरी मुलं या बैलगाडीखाली येऊन गंभीर जखमी झाल्याने सर्वत्र तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

दरम्यान, या शर्यतीची परवानगी घेतली होती का? भाजप जिल्हाध्यक्ष नेहमीच स्टंटबाजी करत आपला वाढदिवस साजरा करतात. नेहमीच काही ना काही घटना घडते असेही जनतेतून बोलले जात आहे. आता या घटनेवर कशा पद्धतीने कारवाई होणार हेदेखील पाहणे गरजेचे आहे.

नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हेची निर्घृण हत्या? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here