हे दोघं विभक्त झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल, त्यांच्या ब्रेकअपबद्दल ना अर्जुन कधी बोलला ना अर्पिता. त्यांच्या नात्याबाबत दोघांनीही आजतागायत मौनच बाळगलं होतं. परंतु एका मुलाखतीमध्ये अर्जुननं त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. त्याचवेळी सलमानबरोबर त्याचं नातं कसं होतं हे देखील सांगितलं होतं.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अर्जुन कपूर (Arjun Kapoor) नं सांगितलं की, ‘माझं पहिलं प्रेम अर्पितावर होतं. तिच्याबरोबरच्या नात्याबाबत मी खूपच सिरीअस होतो. मी जेव्हा १८ वर्षांचा होतो तेव्हा आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. आमचं नातं दोन वर्ष टिकलं. अर्पिताशी नातं जुळण्याआधी मी सलमानभाईशी जोडला गेलेला होतो.
‘ब्रेस्टवर मारलं, माझा विनयभंग होत होता…’ केतकीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं
‘मैने प्यार क्यों किया?’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळेपासून आमच्या नात्याला सुरुवात झाली. मी सलमानभाईला खूप घाबरलो होतो. सलमानभाईनं जाऊन घरातल्यांना ही गोष्ट सांगितलं. परंतु त्यांना आधी आमच्या नात्याबाबत कळावं असं मला वाटत होतं. याबाबत ते खूपच दयाळू आहे. ते कायम लोकांचा आणि नात्याचा सन्मान करतात. ते कायम माझीच बाजू घ्यायचे.’

माझं वजन १४० किलो होतं
अर्जुननं मुलाखतीमध्ये पुढे सांगितलं की, ‘अर्पिता आणि मी रिलेशनमध्ये होतो तेव्हा माझं वजन १४० किलो होतं. सलमान ए इश्क सिनेमासाठी मी निखील आडवाणी याला असिस्ट करत होतो. एक गर्लफ्रेंड होती, मला पार्ट्या करता येत होत्या..थोडक्यात माझं आयुष्य योग्य मार्गानं जात होतं. मी एकदम निश्चिंत होतो. २२ वर्षांचा होईपर्यंत मी दिग्दर्शक होईल असं मला वाटत होतं. परंतु अर्पितानं ब्रेकअप केलं आणि मी पुरता गोंधळून गेलो. आता मी काय करू या विचारात मी पडलो.’
वन- नाइट स्टँडनंतर अभिनेत्री झाली गरोदर, अबॉर्शन करण्याची आली वेळ
सलमान मला मोठ्या भावासारखा
अर्पिताशी ब्रेकअप झाल्यानंतरही अर्जुन सलमानबरोबर होता. त्याच्याबरोबर हँगआऊटलाही जायचा. सलमान त्याला मोठ्या भावासारखा असल्याचं त्यानं अनेकदा सांगितलं होतं. सलमान त्याचा मित्र, वडिलांसारखा, मोठा भाऊ असं सारं काही आहे. सलमानच्या रुपानं अर्जुनला मोठा भाऊ मिळाला होता. सलमानचं स्थान त्याच्या आय़ुष्यात महत्त्वाचं होतं.
अर्जुन मलायका रिलेशनशिप
दरम्यान, सध्या अर्जुन आणि मलायका अरोरा रिलेशनशीपमध्ये आहेत. मलायका अर्जुनपेक्षा वयानं मोठी आहे, इतकंच नाही तर सलमानच्या भावाची अरबाज खानची ती पूर्वाश्रमिची पत्नी आहे. त्यामुळे अर्जुन आणि मलायकाच्या नात्याची खूपच चर्चा झाली. त्यांच्यावर टीका देखील झाली. परंतु अर्जुन-मलायकानं त्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. तर अर्पितानं आयुष शर्माबरोबर लग्न केलं असून तिला दोन मुलं आहेत.