सलग चार दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली आहे. त्यामुळे या पावसाळी वातावरणात सिंधुदुर्ग विमानतळावरील (चिपी विमानतळ) विमानसेवा अनियमित दिसत आहे. उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईकडे विमानाने जाणाऱ्या प्रवाशांमध्ये निराशा पसरली आहे. खराब हवामानामुळे चिपी विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून एकही विमान उतरलेले नसल्याची माहिती आहे.

हायलाइट्स:
- सलग चार दिवस चिपी विमानतळावर विमान उतरले नाही.
- खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ.
- मुंबईकडे विमानाने जाणाऱ्या प्रवाशांमध्ये निराशा.
सलग चार दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली आहे. त्यामुळे या पावसाळी वातावरणात सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा अनियमित दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबईकडे विमानाने जाणाऱ्या प्रवाशांमध्ये निराशा आहे. खराब हवामानामुळे चिपी विमानतळावरन गेल्या चार दिवसांपासून विमान लँडिंग झालेले नाही.
क्लिक करा आणि वाचा- बंडखोर शिवसेना आमदार दीपक केसरकरांच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न
चिपीच्या माळरानावर ९ ऑक्टोबरला अलायन्स एअर कंपनीचे ७२ आसनी प्रवासी विमान सुरू झाले. या विमानसेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. विमानसेवा सुरू झाल्यापासून खराब हवामानाचा फटका विमान सेवा देणाऱ्या अलायन्स एअर कंपनीला आणि प्रवाशांना वारंवार बसत आहे.
क्लिक करा आणि वाचा- दापोलीत शिंदेंच्या समर्थनात घोषणाबाजी; वैभव नाईकांचेही मोठे वक्तव्य
क्लिक करा आणि वाचा- ‘उद्धव ठाकरेंनी १११२ आमदार घेऊन IPL टीम बनवावी’, निलेश राणेंकडून जहरी टीका
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : the plane has not landed at chippewa airport for the past four days due to bad weather
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network