सांगली : जिल्ह्यातील म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील सामूहिक हत्याकांडाप्रकरणी पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनमोरे कुंटुंबातील सदस्यांना तब्बल ९ बाटल्यांमध्ये मांत्रिकाने विषारी औषध प्यायला दिलं असल्याचं समोर आलं आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी मांत्रिकाला वनमोरे कुटुंबाकडून ४ वर्षांपासून पैसे देण्यात येत होते. मात्र, गुप्तधन मिळत नसल्याने पैसे परत देण्यासाठी वनमोरे कुटुंबाकडून मांत्रिकाकडे तगादा सुरू होता. त्यामुळे या मांत्रिकाने असं कृत्य केलं आहे.

या हत्याकांडाआधी काळ्या जादूचा विधी देखील झाल्याचं समोर आलं आहे. या विधीमध्ये गुप्तधन प्राप्तीसाठी वनमोरे कुटुंबाला अकराशे गहू मोजण्यासाठी लावले. गुप्तधन मिळवण्यासाठी मांत्रिकाला वनमोरे कुटुंबाकडून ४ वर्षांपासून पैसे देण्यात येत होते. मात्र, गुप्तधन मिळत नसल्याने पैसे परत देण्यासाठी वनमोरे कुटुंबाकडून मांत्रिकाकडे तगादा सुरू होता. दरम्यान, या हत्याकांडाआधीच वनमोरे कुटुंबाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. धक्कादायक बाब म्हणजे वनमोरे कुटुंबाचे सुसाईड नोटच्या २ प्रती या मांत्रिकाच्या घरात सापडल्या आहेत.

महाराष्ट्राला हादरवणारी हत्येची घटना, नवनीत राणांचं अमित शहांना पत्र, NIA कडे तपास सुपूर्द
संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ हत्याकांडाचा आता संपूर्ण पर्दाफाश झाला आहे. हा हत्याकांड का आणि कसा झाला याचा अखेर खुलासा झाला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हैसाळ हत्याकांडाचा कारण आणि थरार कथन केले आहे. गुप्तधनाच्या प्रकरणातून दोघा मांत्रिकाकडून हा हत्याकांड झाल्याचं स्पष्ट झाले आहे.

मांत्रिकेच्या माध्यमातून गुप्तधनाचा खटाटोप सुरू होता

उच्चशिक्षित असणाऱ्या वनमोरे कुटुंबीय हे गेल्या ४ वर्षांपासून गुप्तधनासाठी सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान आणि त्याचा साथीदार धीरज सुरवशे यांच्या संपर्कात होते. या गुप्ताधनाच्या आमिषापोटी वेळोवेळी वनमोरे बंधूंनी मांत्रिक अब्बास बागवान याला पैसे दिले होते. मांत्रिकेच्या माध्यमातून गुप्तधनाचा खटाटोप सुरू होता. त्यासाठी काळी-जादू आणि वेगवेगळ्या पूजा-विधी वनमोरे यांच्या घरी सुरू होत्या. मात्र, हे करून देखील चार वर्षांमध्ये गुप्तधनाचा शोध लागला नाही. पण गुप्तधनाच्या शोधासाठी वनमोरे कुटुंबीयांनी गावातील अनेक लोक व सावकारांकडून लाखो रुपयांचा कर्ज व्याजावर घेतलं होतं. पण गुप्तधन मिळत नव्हतं त्यामुळे वनमोरे कुटुंबाकडे कर्जाचा वसुलीचा तगादा सुरू होता.

दोन वर्षांचा असताना आईपासून दुरावला, अकोल्यात पट्टेदार वाघ मृतावस्थेत
वनमोर कुटुंबीयांच्या पैशाच्या तागाद्यामुळे मांत्रिक अब्बास आणि त्याचा साथीदार धीरज या दोघांनी वनमोरे कुटुंब संपवण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने १९ जून रोजी अब्बास व धीरज हे दोघेजण सोलापूरहुन म्हैसाळ येथे पोहोचले. मग वनमोरे कुटुंबीयांना गुप्तधनासाठी विधी करायचं असं सांगितलं. त्यानंतर काही वेळ काळ्या जादूच्या विधीचा प्रकार झाला. यातून वनमोरे कुटुंबीयांना अकराशे गहूचे दाने काढायला सांगून प्रत्येकाला ७ वेळा गव्हाचे दाणे मोजण्यास सांगितले. त्यानंतर मांत्रिकाने पोपट वनमोरे यांच्या घरामध्ये जाऊन पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाला टेरेसवर बोलवले. आणि आपल्या सोबत आणलेले विषारी औषधाच्या गोळ्याची पावडर बनवून लिक्विड केलेल्या ९ विषाच्या बाटल्यांपैकी तीन बाटल्या पोपट वनमोरे, त्यांची पत्नी व मुलगी यांना देऊन खाली जाऊन पिण्यास सांगितलं. हे होत असताना कोणतीच कल्पना मांत्रिकांनी होऊ दिली नाही.

तिथून शुभमला घेऊन हे मंत्री डॉक्टर माणिक वनमोरे यांच्या घरी पोहोचले त्या ठिकाणीही मांत्रिक अब्बास व धीरज सूरवशे यांनी डॉक्टर मानिक वनमोरे यांच्या कुटुंबीयांना टेरेसवर बोलावलं. त्या ठिकाणीही विधी करून सोबत आणलेल्या विषाच्या बाटल्या त्यांची दोन मुलं आणि आई यांना दिल्या व खाली जाऊन पिण्यास सांगितल्या त्याचबरोबर शुभमलाही विषाची बाटली देण्यात आली. आणि त्यालाही खाली जाऊन सांगितलं. रात्री एक वाजल्यापासून पहाटे साडेचार पर्यंत मांत्रिकाचा हा खुनी खेळ सुरू होता. मग सर्वजण मृत झाल्याचं खात्री करून मांत्रिकाने आपल्या साथीदारासह म्हैसाळ मधून पळ काढला.

गुप्तधनाच्या लालसेपोटी हा सर्व हत्याकांड घडला आहे. गुप्तधनासाठी देण्यात आलेले पैसे आणि मग पैसे पुन्हा मागण्याचा वनमोरे कुटुंबीयांकडून सुरू झालेला तागादा यातूनच मांत्रिकाने हा सर्व हत्याकांड केल्याचं आता उघडकीस आलं आहे. याप्रकरणी अब्बास बागवान आणि धीरज सुरवसे राहणार सोलापूर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत ही कलमही वाढवण्यात आले आहे. अब्बास बागवान याच्या सोलापूर येथील घरावर छापा टाकला असता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे वनमोरे हत्याकांडाच्या आधीच वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्याची चिठ्ठी लिहिलेली आहे. तसेच ज्या चिठ्ठ्या घटनास्थळी सापडल्या त्याच्या २ प्रती अब्बास बागवान याच्या घरी देखील सापडल्या आहेत. त्याचबरोबर काळया जादूसाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील बागवान याच्या घरी मिळून आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

ठाकरेंकडून नेतेपदावरुन हकालपट्टी होताच शिंदेंनी बाह्या सरसावल्या, कोर्टात भिडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here