मुंबई : मुख्यमंत्रिपदाच्या जेव्हा घडामोडी होत होत्या, तेव्हा काय चाललंय हे स्वत: देवेंद्र फडणवीस सोडून इतर कुणालाही माहिती नव्हतं. जेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी घोषणा केली, तेव्हा भाजपचे कार्यकर्ते-आमदार-खासदार सगळेच शॉक झाले. काय झालंय, हे कुणालाच कळत नव्हतं, त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली. आमदार खासदारांनी मोदी-शहांकडे विचारणा केली की, देवेंद्रजी नसतील तर सत्ता कशी चालवता येईल? अगोदर त्यांनी सरकारमध्ये सामिल होणार नाही, असं सांगितलं. आणि आमदार खासदार यांच्या रेट्यामुळे आणि हायकमांडच्या निर्देशानंतर त्यांचा नाईलाज झाला, अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असा घटनाक्रम भाजप नेते आमदार संजय कुटे यांनी सांगितला.

एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा ठरुन ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं सगळ्यांनाच वाटलं. पण २ तासांत सूत्र फिरली. एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, असं जाहीर करतानाच मी सरकारमध्ये सामिल होणार नाही, असं सांगणाऱ्या फडणवीसांना हायकमांडच्या आदेशाने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. या साऱ्या प्रकाराने भाजप नेते बुचकाळ्यात पडले. आमदारांनाही नेमकं काय चाललंय, हे कळायला मार्ग नव्हता. याच सगळ्या विषयावर एका वृत्तवाहिनीने आमदार संजय कुटे यांच्याशी विशेष संवाद साधला. या संवादात त्यांनी ३० तारखेच्या घटनांवर प्रकाशझोत टाकला.

राज ठाकरेंकडून कौतुक, मुलाकडून फडणवीसांवर नाराजी, अमित ठाकरेंचं ‘आरे’ला कारे
त्यांचा नाईलाज झाला…!

त्यादिवशी नेमके काय घटनाक्रम घडतायेत, हे कुणालाच ठाऊक नव्हतं. राजभवनावर जाईपर्यंत कुणाला काही माहिती नव्हतं. फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी घोषणा केली, तेव्हा भाजपचे कार्यकर्ते-आमदार-खासदार सगळेच शॉक झाले. त्यानंतरच्या दोन तासांत कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आली. बहुतांश आमदार-खासदारांनी वरिष्ठांना संपर्क केला. देवेंद्रजी नसतील तर सत्ता कशी चालवता येईल?, असा सवाल लोकप्रतिनिधींनी वरिष्ठांना विचारला. त्यावर हायकमांडने देखील विचार केला आणि काहीच वेळात देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात सामिल होण्याचे निर्देश दिले. वरिष्ठांच्या निर्देशानंतर त्यांचाही नाईलाज झाला, अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

खूप दिवसांनी ‘अशी’ जोडी पाहायला मिळाली! शिंदेंनी VIDEO कॉल करताच अण्णांकडून कौतुक
इच्छेने नाही तर नाईलाज म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं…!

देवेंद्रजींनी नंतर ठरवलं की मी सरकारमध्ये सामिल होणार नाही, मी प्रदेशाध्यक्ष होईन, २०२४ च्या दृष्टीने पक्षबांधणी करेल. एवढा मोठा त्याग करुन पक्षाच्या सेवेसाठी त्यांनी स्वत:ला तयार केलं होतं. परंतु आमदार-खासदार-कार्यकर्ते सगळेच त्या दोन तासांत अनरेस्ट झाले होते. त्यामुळे मोदी-शहा-नड्डांना विनंतीवजा निर्देश द्यावे लागले की, देवेंद्र तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागेल. अगोदर त्यांनी सरकारमध्ये सामिल होणार नाही, असं सांगितलं. आणि आमदार खासदार यांच्या रेट्यामुळे आणि हायकमांडच्या निर्देशानंतर त्यांचा नाईलाज झाला, अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली! इच्छेने नाही तर नाईलाज म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं, कारण त्यांनी त्याग करुन बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली, असं संजय कुटे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here