गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बहुलच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्याच्या सुरुवातीला शाळेतील त्यांचा पहिला दिवस कायमचा स्मरणात राहणार आहे. कारण त्यांनी आता कागदावर कुंकूच्या पाऊलखुणा उमटवून औपचारिक शिक्षणात पहिलं पाऊल ठेवलं आहे.

२९ जून रोजी जवळपास दोन वर्षांनंतर गडचिरोली जिल्ह्यातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. करोनातील परिस्थितीमुळे राज्यात प्रत्यक्ष अध्यापन बंद ठेवण्यात आले होते. पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलांचा प्रवेश फक्त हजेरी पटावर होता. मात्र, प्रत्यक्षात पहिलीच्या वर्गात त्यांचे पहिलं पाऊल पडलचं नाही. पर्याय म्हणून ऑनलाइन अध्यापन चालू होते. पायाच कच्चा राहिल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ही परिस्थिती लक्षात घेता शाळा पूर्व तयारी म्हणून उन्हाळ्यात पहिला मेळावा आणि २९ जून रोजी दुसरा मेळावा घेतला. यावर्षी नवीन शैक्षणिक सत्राच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे २९ जून रोजी दाखल पात्र विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले.

खूप दिवसांनी ‘अशी’ जोडी पाहायला मिळाली! शिंदेंनी VIDEO कॉल करताच अण्णांकडून कौतुक
जिल्ह्यातील काही शाळांनी या विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत झाले. ते म्हणजे त्यांच्या शाळांनी एक जुना मराठी विधी ‘पहिलं पाऊल’ उपक्रम केला. जिथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पहिली पाऊले कागदावर उमटवून घेतली. पहिल्या इयत्तेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला गोल आकाराचा पांढरा कागद देण्यात आला. एक-एक करून, शिक्षकांनी त्यांना त्यांच्या पायाचे ठसे काढण्यासाठी कागदावर पाऊल ठेवण्यापूर्वी ओला कुंकू भरलेल्या प्लेटमध्ये उभे राहण्यास मदत केली. प्लेट्सवर त्यांच्या पहिल्या दिवसाची तारीख देखील नमूद केली होती.

गडचिरोली जिल्ह्यात काही शाळांनी घेतलेला हा एक भावनिक उपक्रम आहे. बहुतेक शाळांनी पुष्पगुच्छ आणि मिठाई वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तर काही शाळांनी सेल्फी पाॅइंट देखील तयार केले होते. जेणेकरुन मुले शाळेतील त्यांचा पहिला दिवस त्यांच्या पालकांसोबत कॅप्चर करू शकतील. दुर्गम भागात बैलगाडीवर विध्यार्थ्यांना बसवून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून फुलांचा वर्षाव करताना आरती देखील केली. एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यात दखलपात्र विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर काही शाळांनी घेतलेला ‘पहिलं पाऊल’ हा उपक्रम भावनिक असून विध्यार्थ्यांच्या स्मरणात राहणार आहे.

दरम्यान, ‘पहिलं पाऊल’ म्हणजे विद्यार्थ्यांचा शाळेच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. काही शाळांमध्ये त्यांच्या स्मरणिका म्हणून केले आहे. आम्ही पालकांना कागद फ्रेम करून त्यांच्या भिंतीवर टांगण्यास सांगितले आहे. ते केवळ शालेय जीवनातील पूर्वीच्या आठवणीच राहणार नाही तर विशेषत: मुलांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यास प्रवृत्त करेल. असं शिक्षणाधिकारी अरुण धामणे यांनी यावेळी सांगितलं.

राज ठाकरेंकडून कौतुक, मुलाकडून फडणवीसांवर नाराजी, अमित ठाकरेंचं ‘आरे’ला कारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here