अमरावती : देशात खळबळ उडवणाऱ्या अमरावती हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इरफान खान असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आधीच सहा जणांना अटक केली आहे. इरफान खानची अटक ही अमरावती पोलिसांची मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.

नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली.

फडणवीस उपमुख्यमंत्री कसे झाले? २ तासांत काय घडलं? संजय कुटेंनी एक एक करुन सगळं सांगितलं!
या प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी (दि. १) सकाळी ‘एनआयए’चे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नव्हता. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू होता, आज पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून तशी माहिती दिली आहे.

शिंदेसेना की शिवसेना? कोणाचा व्हिप वैध? नियम काय सांगतो? जाणून घ्या सोप्या शब्दांत
या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या ‘एनआयए’च्या पथकाने सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्यातून प्रकरणाबाबत चौकशी केली. नंतर घटनास्थळीसुद्धा पाहणी केली होती. तसेच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचीसुद्धा झाडाझडती घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

खुर्ची शिंदेंना, तिजोरीच्या चाव्या फडणवीसांकडे, गृह-अर्थ खात्याची दुहेरी जबाबदारी?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here