Eknath Shinde on Twitter : सध्या अवघ्या जगाचे लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आणि याचे कारण आहे एकनाथ शिंदे… (Eknath Shinde) शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसात सोशल मीडियातही  तुफान प्रतिसाद मिळत आहे. एकनाथ शिंदेचे  फॉलोअर्स अवघ्या महिनाभरात तब्बल दुपटीनं वाढली आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांचे  23 मे 2022 रोजी एकनाथ शिंदेंचे ट्विटर फॉलोअर्स 2 लाख 12 हजार होते. 29 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंचे ट्विटर फॉलोअर्स  4  लाख 30 हजार तर 2 जुलै 2022 शिंदेंचे फॉलोअर्स  5 लाख 51 हजार झाले. 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आहे. गेल्या काही दिवसात राज्यातल्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं नाव आहे.  याच एकनाथ शिंदेंना गेल्या काही दिवसात सोशल मीडियातही तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे फॉलोअर्स अवघ्या महिनाभरात तब्बल दुपटीनं वाढले आहेत. बंडखोरीनंतर शिंदे पहिल्यांदा ट्विटरच्याच माध्यमातून  समोर आले. 21 जूनला बंड पुकारत एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला पोहोचले त्यानंतर 10 दिवसात शिंदेंनी अनेक  ट्विट्स केले.

सोशल मीडियाचा वापर करून 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आलं. आणि सोशल मीडियाची खरी ताकद कळाली. तेव्हापासून प्रत्येक पक्ष लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करताना दिसतोय. एकनाथ शिंदेंनीही बंड पुकारल्यापासून सोशल मीडियात त्यांची चांगलीच चर्चा झाली. आणि त्यांचे फॉलोअर्स झपाट्यानं वाढले. 

कधीही ट्विटरवर अॅक्टिव्ह नसणाऱ्या शिंदेंनी गेल्या काही दिवसात ट्विट्सचा धडाकाच लावला. गुवाहाटीत बसून जे काही म्हणणं मांडायचं ते ट्विटरवरून…त्यामुळे शिंदे सोशल मीडियातही फॉर्मात आले.  फक्त शिंदेच नव्हे  तर शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांचीही  सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे. आमदार शहाजीबापू पाटील तर सोशल मीडिया किंग झाले.
आता मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंची लोकप्रियता आणखी वाढेल आणि सोशल मीडियातला त्यांचा दबदबाही वाढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here