मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणावर आपल्या तिरकस आणि हटके शैलीत भाष्य करणारे प्रख्यात अभिनेते किरण माने यांनी पुन्हा एक फेसबुक पोस्ट लिहित लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या नोटिसांमुळे अनेक नेत्यांना कार्यालयाच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. अनिल परब, संजय राऊत यांसारखे नेते नुकतेच ईडीच्या चौकशांना सामोरे गेले. त्यानंतर किरण मानेंनीही ईडीवर भाष्य करणारी दोन ओळींची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ईडीची खिल्ली उडवणाऱ्या अनेक पोस्ट सध्या फेसबुकवर आहेत. त्यात मानेंनीही आपल्या स्टाईलमध्ये टिप्पणी केली आहे.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट काय?

“नमस्कार सर, मी ED ऑफिसमधून बोलतोय.”
“नमस्कार. मी कट्टर हिंदूत्ववादी किरण माने.”

किरण मानेंना सुचवायचंय तरी काय?

ईडी ही तपास यंत्रणा भाजपच्या कार्यालयातून चालते, अशा प्रकारचे मीम्स अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आतापर्यंत शरद पवार, राहुल गांधी, एकनाथ खडसे, राज ठाकरे, छगन भुजबळ, नवाब मलिक, संजय राऊत, प्रताप सरनाईक यासारख्या भाजपेतर नेत्यांना ईडीच्या नोटिसा आल्या आहेत. मात्र देशात सत्ताधारी असलेल्या भाजपचा एकही नेता ईडीच्या फेऱ्यात सापडलेला नाही. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी असल्याचा मुखवटा घेतल्यास ईडीच्या ससेमिऱ्यातून सुटका होते, असंच काहीसं मानेंना सुचवायचं असावं, असं नेटिझन्स म्हणतात.

हेही वाचा : गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के ‘प्यूअर’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

अभिनेते किरण माने हे मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटीलच्या भूमिकेत दिसले होते. मात्र अचानक त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे त्यांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते.

वाचा किरण मानेंची फेसबुक पोस्ट

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

किरण मानेंची फेसबुक पोस्ट

नुकतंच किरण माने यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना भलीमोठी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळं झालेलं दु:ख व्यक्त केलं आहे.

हेही वाचा : राज्यात खळबळ उडवणारे उमेश कोल्हे हत्या प्रकरण, मास्टरमाईंड इरफान खानला बेड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here