Devendra Fadnavis | हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले, हाच खरा भूकंप आहे, असे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.

हायलाइट्स:
- देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले हाच खरा भूकंप आहे
- देवेंद्र फडणवीस पुन्हा आले, पण ते असे अर्धवट येतील येतील, असे कुणालाच वाटले नव्हते
- पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली
महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिंदेच्या बंडाबाबत झाले, पण त्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्य म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देत होता, पण सत्य वेगळेच होते. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले, हाच खरा भूकंप आहे, असे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.
‘देवेंद्र फडणवीसांवर हा काळाने उगवलेला सूड’
पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसात सख्य नव्हते. “मला उपमुख्यमंत्रीपद नको, चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा”, अशी त्याची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली. कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. है त्यांच्या कमचि फळ आहे. २०१९ मध्ये सत्तेचा ५०-५० टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले व आता बंडखीर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे, अशी टिप्पणीही रोखठोक या सदरात करण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : shivsena sanjay raut taunts devendra fadnavis over bjp give him dcm post make eknath shinde cm
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network