Vidhansabha Speaker Election | शीरगणीतीद्वारे सत्ताधारी आमदार १, २, ३ याप्रमाणे मत देत होते. पण यात काही आमदारांनी त्यांचा आसन क्रमांकच सांगितला. यामुळे विधिमंडळात चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आणि आसन क्रमांकाप्रमाणेच मतमोजणी करण्याची विनंती केली. याला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुमोदन दिलं आणि त्यानुसार शिरगणतीला सुरुवात करण्यात आली.

 

ShahajiBapu Patil
शहाजीबापू पाटील

हायलाइट्स:

  • मतदान करण्यासाठी शहाजीबापू पाटील यांचा ११२ वा क्रमांक होता
  • ‘काय झाडी,काय डोंगार, काय हाटील’फेम आमदार शहाजीबापू पाटील
  • आमदारांची डायलॉगबाजी
मुंबई: विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी रविवारी विधिमंडळात मतदानप्रक्रिया पार पडली. यावेळी आवाजी पद्धतीने नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदारांनी आपल्या जागेवर उभे राहत राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले. यावेळी ‘काय झाडी,काय डोंगार, काय हाटील’फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले. मतदान करण्यासाठी शहाजीबापू पाटील यांचा ११२ वा क्रमांक होता. ते जागेवर उभे राहताच सभागृहातील आमदारांनी एका सूरात ‘काय झाडी,काय डोंगार, काय हाटील’ असा डायलॉग म्हटला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. (Vidhansabha Speaker Election)
Shivajirao Adhalrao Patil: शिवसेनेचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, शिवाजीराव आढळराव पाटलांवर कारवाई नाही
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांना या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण १६४ मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना १०७ इतकी मते मिळाली. तसंच रईस शेख, अबू आझमी आणि शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. अखेर या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे विधिमंडळातील पहिली लढाई ही तुर्तास भाजपने जिंकली आहे. यावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पक्षाच्या व्हिपविरोधात मतदान केले, याची नोंद विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडून घेण्यात आली. सभागृहाच्या पटलावर याची नोंद झाली आहे. त्यामुळे आता १२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीअंती शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरल्यास राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा बदल होऊ शकतो.
Shivsena Assembly Office Sealed: विधानभवनातील शिवसेना कार्यालयाला टाळे
मतमोजणी सुरू असतानाच जयंत पाटलांची सूचना आणि फडणवीसांचंही अनुमोदन

शीरगणीतीद्वारे सत्ताधारी आमदार १, २, ३ याप्रमाणे मत देत होते. पण यात काही आमदारांनी त्यांचा आसन क्रमांकच सांगितला. यामुळे विधिमंडळात चांगलाच गोंधळ उडाला. या गोंधळावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आणि आसन क्रमांकाप्रमाणेच मतमोजणी करण्याची विनंती केली. याला भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनुमोदन दिलं आणि त्यानुसार शिरगणतीला सुरुवात करण्यात आली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : vidhansabha speaker election eknath shinde camp mla shahajibapu patil mla cheers while he voting
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here