मुंबई: सध्या धर्मवीर चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरू आहे. ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. ठाणेच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात अनोख्या राजकीय शैलीमुळं ओळख निर्माण झालेल्या दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटातील एक सीन प्रचंड व्हायरल झाला. आनंद दिघेंच्या आयुष्यातील हे शेवटचे काही क्षण होते.अपघातानंतर आनंद दिघे हॉस्पिटलमध्ये असताना राज यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याचाच हा प्रसंग आहे.

आनंद दिघे आणि राज यांच्यातील या हॉस्पिटलमध्ये भेटीतही हिंदुत्वावर चर्चा झाली होती. ‘धर्मवीर हिंदुत्वाचं काम अजूनही सर्वदूर पोहोचलं नाहीए, असं पडून राहून कसं चालेल’, असं तत्कालीन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिघेंना म्हणताना दिसत आहेत. यावर ‘हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर’ असं दिघे राज यांना म्हणतात. या प्रसंगावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं.
Video: हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर…आनंद दिघे आणि राज ठाकरेंची अखेरची भेट
आता झेंडा या चित्रपटातील एक संवाद चर्चेत आला आहे. ठाकरे घराण्याच्या राजकारणावर भाष्य करणारा आणि त्यांच्या व्यक्तीरेखांशी साम्य असणारा अवधूत गुप्तेचा ‘झेंडा’ हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. आजही या चित्रपटातील गाणी तरुणांच्या फोनमध्ये ऐकायला मिळतात.

ठाकरे घराण्याचा राजकारणाचा सामन्य कार्यकर्त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो. असा ‘झेंडा’ या चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी मुख्य भूमिका साकरल्या आहेत. दोघंही कार्यत्याच्या भूमिकेत आहे. चित्रपटात अभिनेता राजेश श्रृंगारपुरेनं राज ठाकरे यांच्याशी साम्य असलेली राजेश सरपोतदार भूमिका साकारली होती.

या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरचा एक संवाद आहे. जो राजेश सरपोतदार यांना उद्देशून असतो. ‘राजेश सरपोतदार हे उद्याचं नेतृत्व आहे. ‘सावरकरांच्या स्वप्नातील हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची ताकद फक्त त्यांच्यात आहे’, असा हा संवाद आहे.

हा संवाद सध्या चर्चेत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here