मुंबई: ‘कोण होणार करोडपती’ हा शो सध्या चर्चेत आला आहे. यंदाही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेते सचिन खेडेकर सांभाळत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलंय.
‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटातील मुख्यमंत्र्यांची भूमिका माझी विशेष आवडती आहे. राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या व्यक्तींचे विविधांगी पैलू मांडण्याची संधी यानिमित्तानं मिळते. प्रत्येक भूमिकेचे विचार मला पटत नाहीत. पण एक अभिनेता म्हणून ती भूमिका उत्तम वठवण्याचा माझा प्रयत्न असतो. सक्रिय राजकारणात उतरण्यासाठी मी अजिबात इच्छुक नाही’, असं खेडेकर म्हणाले.