मुंबई : “एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांच्या कानात नाही सांगितलं ती त्यांची चूक होती. पण तुम्हाला भविष्यात असं कधी वाटलं तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा. जयंत पाटलांच्या कानात कधीच सांगू नका, तिथे सांगाल तर धोका आहे. इच्छा होईल तेव्हा फक्त कानात सांगा”, असं खुलं आमंत्रण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दिलं.

९ दिवस ९ रात्रीच्या सत्तासंघर्षानंतर रविवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. विधानसभेत आवाजी पद्धतीने घेण्यात आलेल्या मतदानात राहुल नार्वेकर यांनी १६४ मते मिळवत बाजी मारली. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या अभिनंदन प्रस्तावावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शैलीत केलेले भाषण चांगलाच चर्चेचा विषय ठरले. हे भाषण ऐकून अजितदादा नव्या विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन करत होते की त्यांना शालजोडीतील टोले लगावत होते, हा प्रश्न अनेकांना पडला.

‘एकनाथ शिंदेंनी मला कानात सांगितलं असतं तर आम्हीच मुख्यमंत्री केलं असतं’; अजित पवारांच्या फटकेबाजीने सभागृहात हास्यकल्लोळ
‘शिंदे साहेब तुम्ही फक्त माझ्या कानात सांगितलं असतं तरी आम्ही आधीच तुम्हाला तिथं बसवलं असतं,’ असं म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना यांना चिमटा काढला. अजितदादांच्या टोलेबाजीवर विधानसभेतील सगळेच आमदार खळखळून हसले. नंतर सुधीर मुनगंटीवर बोलायला उभे राहिले. त्यांनी अध्यक्षांचं अभिनंदन करुन झाल्यावर आपला मोर्चा अजितदादांकडे वळवला. “एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांच्या कानात नाही सांगितलं ती त्यांची चूक होती. पण तुम्हाला भविष्यात असं कधी वाटलं तर आमच्या कानात मात्र नक्की सांगा”, अशी खुली ऑफरच त्यांनी अजित पवार यांना दिली. यावेळी त्यांनी जयंत पाटलांना मात्र जोरदार चिमटा काढला. जयंत पाटलांच्या कानात कधीच सांगू नका, तिथे सांगाल तर धोका आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

दीपक केसरकर काय चांगला प्रवक्ता झालाय, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही: अजित पवार
आदित्य ठाकरे अध्यक्ष महोदयांना गुरुदक्षिणा नक्की देतील

आदित्य ठाकरे नवनिर्वाचित अध्यक्षांना गुरुदक्षिण नक्की देतील. शिवसेनेत अजून काही उरलेत ते गुरुदक्षिण म्हणून मिळतील अशी अपेक्षा. कारण, नार्वेकरांनी आदित्य ठाकरे यांना शिकवलंय, असा टोला मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. त्यावर ते माझा चांगले मित्र होते आणि आहेत. मित्र म्हणून आम्ही त्यांच्याकडे जायचो, एकत्र प्रवास करायचो, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुनगंटीवारांचा टोला परतावून लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here