Ajit Pawar on Deepak Kesarkar | अजित पवार यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या गणेश नाईक, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील यांचा उल्लेख केला. त्यानंतर अजितदादांनी आपला मोर्चा अचानक दीपक केसरकर यांच्याकडे वळवला. अजित पवार यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री साहेब तुमच्या मागचा दीपक केसरकर तर काय चांगला प्रवक्ता झाला आहे. म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकवलेले कुठेही वाया गेले नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- मुळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त दिसतात
- आमच्या मंडळींना बघून मला भाजपमधील मूळ मंडळींचं वाईट वाटतं
- आज भाजपमध्ये पदावर असलेली मंडळी आमच्याकडून गेलेली आहेत
यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांविषयी बोलत होते. या सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो, तेव्हा मुळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त दिसतात. आमच्या मंडळींना बघून मला भाजपमधील मूळ मंडळींचं वाईट वाटतं. आज भाजपमध्ये पदावर असलेली मंडळी आमच्याकडून गेलेली आहेत. भाजपमधील मूळ मान्यवरांना बाजूला सारून ते पदावर बसले आहेत. पहिली लाईन बघितली तरच हे लक्षात येईल, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली.
यावेळी अजित पवार यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या गणेश नाईक, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील यांचा उल्लेख केला. त्यानंतर अजितदादांनी आपला मोर्चा अचानक दीपक केसरकर यांच्याकडे वळवला. अजित पवार यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्री साहेब तुमच्या मागचा दीपक केसरकर तर काय चांगला प्रवक्ता झाला आहे. म्हणजे त्यावेळेस आम्ही शिकवलेले कुठेही वाया गेले नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. अजितदादांच्या या वक्तव्यावर दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण सभागृह हसायला लागले. विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावेळी सभागृहात झालेल्या भाषणांमध्ये अजित पवार यांचे भाषण अत्यंत प्रभावी ठरले. आपल्या भाषणात अजित पवार यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.
‘राहुल नार्वेकर ज्या पक्षात जातात, तिथल्या नेतृत्वाशी जवळीक साधतात’
कोणत्याही पक्षात गेल्यावर नेतृत्त्वाच्या जवळ जाणं हे राहुल नार्वेकर यांचे कौशल्य आहे. शिवसेनेत असताना ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मला आपलंसं करुन टाकला. त्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. आता एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांना आपलंस करुन घ्यावं, नाहीतर तुमचं काही खरं नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. अजितदादांनी भाषणाच्या ओघात राहुल नार्वेकर कशाप्रकारे विविध राजकीय पक्षांचा प्रवास केला आहे, हेदेखील अप्रत्यक्षरित्या सूचित केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp leader ajit pawar praises eknath shinde camp spokeperson deepak kesarkar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network