Aaditya Thackeray on Shivsena rebel MLA’s | सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार?
हायलाइट्स:
- रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते
- आजच्या दिवशी नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली
- सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
‘अनेकांना वाटलं होतं, एकनाथ शिंदेंला काय मिळणार?, पण…..’
तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांना फोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. आमच्या संपर्कात १०,१५,२० जण आहेत, असे सांगितले जात होते. तेव्हा मी बोललो की, कोण तुमच्या संपर्कात आहे, ते सांगा मी त्यांना विमानाने पाठवून देतो. एकाला तर मी स्वत: विमान देऊन परत पाठवले. त्यामुळे आमदारांवर कोणतीही जोर-जबरदस्ती झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ११५ आमदार असूनही त्यांनी ५० आमदार असलेल्या मुला मुख्यमंत्रीपद दिले. सगळ्यांना वाटलं होतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदेला काय मिळणार? परंतु भाजपने माझा सन्मान केला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांचा आभारी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : aaditya thackeray slams shivsena eknath shinde camp rebel mla’s in maharashtra assembly session
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network