नांदेड निवडणुकीत शिवसेना पक्षाने बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिले तरीही गद्दार झाले. कल्याणकर यांना यापुढे गुलाल लागू देणार नाही. असं म्हणत नांदेड शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी शपथ घेतली.

 

maharashtra political crisis nanded shiv sena liaison chief anand jadhav criticizes mla balaji kalyankar
‘बालाजी कल्याणकर यांना निवडणुकीत पक्षाने दीड कोटी दिले, तरीही गद्दार झाले’

हायलाइट्स:

  • आमदार बालाजी कल्याणकरांना पुन्हा गुलाल लागू देणार नाही
  • बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट
  • शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांचा घणाघात
नांदेड : शिवसेनेचे नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर शिंदे गटात सामील झाल्यानंतर नांदेडमध्ये शिवसेनेने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आमदार बालाजी कल्याणकर निवडून आलेल्या नांदेड उत्तर मतदार संघात शिवसेनेने मेळावा घेतला. यावेळी नांदेडचे शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी आमदार कल्याणकर यांच्यावर निशाणा साधला. ‘पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी केला आहे.

महाराष्ट्रमधल्या कोणत्याच आमदाराला १ कोटीच्या वर निधी दिला नव्हता. पक्षाने निवडणुकीसाठी उभे असलेल्यांना १ कोटी रुपये दिले पण कल्याणकर यांना दिड कोटी रुपये दिले तरीही ते गद्दार झाले, असं संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी यावेळी सांगितलं. एकाच गोष्टीचं वाईट वाटत की माझ्या बाळासाहेबांच्या, उद्धवसाहेबांच्या शिवसैनिकांनी जिवाचं राण केलं, रक्ताचं पाणी केलं आणि बालाजी यांना निवडून दिलं. परंतू, ते गद्दार झाले या गोष्टीचं सर्वात जास्त वाईट वाटतं, असं जाधव यांनी यावेळी सांगितलं. यापुढे बालाजी कल्याणकर यांना आयुष्यात गुलाल लागू देणार नाही, अशी शपथही जाधव यांनी यावेळी घेतली आहे.

मोठी बातमी! अमरावती हत्या प्रकरणात एनआयएकडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, निवडणुकीत पक्ष उमेदवारांना कसे कोट्यवधी रुपये पुरवतो याचा खुलासाच संपर्क प्रमुखाने एकप्रकारे केला. या मेळाव्याला नांदेड उत्तर मधील सर्व शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.

स्वत:ला कर्णधार मानत विराट कोहलीने केली चूक; भारताला बसला मोठा फटका, पाहा आता काय केलं

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra political crisis nanded shiv sena liaison chief anand jadhav criticizes mla balaji kalyankar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here