बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा पाया आता भारताचे संघाने रचला आहे, असे म्हटले जात आहे. कारण भारताने अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडच्या धावसंख्येवर वेसण लावले आणि त्यामुळे त्यांना पहिल्या डावात दमदार आघाडी मिळवता आली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ दुसऱ्या डावात कशी फलंदाजी करतो आणि इंग्लंडच्या संघापुढे किती धावांचे आव्हान ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारताने इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांत गुंडाळला असून १३२ धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने आता विजयाचा पाया रचलेला आहे, त्यावर आता कळस चढवला जातो का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
भारताने सामन्याचा दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघ त्यांच्यावर फॉलोऑन लादणार का, अशी आशा चाहत्यांना निर्माण झाली होती. पण भारताला मात्र ही गोष्ट करता आली नाही. कारण इंग्लंडला धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टोने यावेळी शतक झळकावले आणि भारताचे हे स्वप्न बेचिराख केले. पण भारताच्या गोलंदाजांनी यावेळी हार मानली नाही. कारण भारताच्या गोलंदजाांनी सातत्याने अचूक आणि भेदक मारा सुरुच ठेवला आणि त्यांना यामध्ये यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये अपवाद फक्त जॉनीचा ठरला. जॉनीने यावेळी १४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरानर १०६ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच इंग्लंडवर फॉलोऑनची नामुष्की ओढवली नाही. इंग्लंडचे शेपूटही यावेळी काही काळ वळवळले आणि त्याचा थोडा फटका भारताला बसला. पण तरीही भारताने दमदार गोलंदाजीच्या जोरावर आघाडी मिळवण्यात यश मिळवले.

भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराने चांगला मारा केलाच, पण त्याला मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांची चांगली साथ मिळाली. भारताने यावेळी इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांत गुंडाळला, त्यामुळेच त्यांना १३२ धावांची दमदार आघाडी मिळवता आली. त्यामुळे आता भारताचे फलंदाज दुसऱ्या डावात कशी फलंदाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण हा सामना जिंकण्यासाठी इंंग्लंडपुढे भारताला मोठे आव्हान ठेवावे लागणार आहे. कारण इंग्लंडने गेल्या तीन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भारताचा संघ किती धावांचे आव्हान इंग्लंडपुढे ठेवते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here