अमरावती: व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरुन २१ जूनला रात्री निर्घृण खून झाला आहे. कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशीअंती हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून तशी माहिती दिली आहे. याच प्रकरणात आता सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात UAPA Unlawful Activities (Prevention) Amendment Act, 2019 दाखल करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

भारताचं अखंडत्व, सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणारे गुन्हे करणाऱ्यांविरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. नेमक्या कोणत्या गोष्टींवर UAPA लावला जाईल, हे ठरलेलं नाही. पण सोप्या भाषेत त्याची व्याख्या सांगायची झाली तर दहशतवादी कारवाया करणं किंवा त्या कृतीत सामील होणं, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन-समर्थन देणं, दहशतवाद घडवण्यासाठी आर्थिक मदत करणं, प्लॅनिंग करणं, अशा कृती केल्याने UAPA लागू शकतो.
अन् मित्रानंच घात केला, १५ वर्षांची मैत्री विसरला! उमेश कोल्हे हत्या प्रकरणात युसूफला अटक
2004, 2008, 2012 आणि 2019 मध्ये या कायद्यात महत्वाच्या सुधारणा झाल्या. पण त्या सगळ्यात वादात सापडलेली सुधारणा ती म्हणजे 2019 मधली. 2019 पर्यंत UAPA हा संघटनांवर लागत होता, कुठल्या एका व्यक्तीवर नाही. पण 2019 मध्ये गृहमंत्री अमित शाहांनी या कायद्यात सुधारणा करत संघटनांसोबतच एखाद्या व्यक्तीवरही UAPA लावण्याची तरतूद समाविष्ट केली.
उमेश कोल्हेंची हत्या, पण दरोड्याचा बनाव रचला; राणांचे यशोमती ठाकूरांवर गंभीर आरोप
उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी (दि. १) सकाळी ‘एनआयए’चे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नव्हता. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here