जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर राहत लग्न उरकलंय. त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. या विवाह सोहळ्याला नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. राज्यात राजकीय वातावरण गरमारमीचं असतानाही त्यांनी लग्नाचा मुहूर्त मात्र पाळलाय. आमदार अंतापूरकर यांचा लग्न सोहळा नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय.

Nanded Deglur Biloli Vidhansabha Congress Mla Jitesh Antapurkar marriage with pratiksha waghmare
जितेश अंतापूरकर लग्नबंधनात अडकले

हायलाइट्स:

  • इकडे मुंबईत हालव्होल्टेज राजकारण
  • तिकडे आमदार जितेश अंतापूरकर विवाहबंधनात
  • जितेश अंतापूरकर हे देगलूर बिलोलीचे काँग्रेसचे आमदार
नांदेड : गेल्या दहा दिवसांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडतायेत. ठाकरे सरकार जाऊन शिंदेचं सरकार स्थापन झालंय. आज तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारने पहिली परीक्षा पास केलीये. दरम्यान याच सत्तांतराच्या घडामोडीत नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आज विवाहबद्ध अडकले आहेत. देगलूरच्या सिद्धेश्वर पॅराडाईज रिसॉर्टवर आज दुपारी साडे बारा वाजता अंतापूरकर विवाहबंधनात अडकले.

जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर राहत लग्न उरकलंय. त्यांच्या लग्न सोहळ्यासाठी मतदारसंघातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. या विवाह सोहळ्याला नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. राज्यात राजकीय वातावरण गरमारमीचं असतानाही त्यांनी लग्नाचा मुहूर्त मात्र पाळलाय. आमदार अंतापूरकर यांचा लग्न सोहळा नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय.

‘देवेंद्रांचं सरकार’ बहुमतात, बहुचर्चित आमदार भुयार यांचा साखरपुडा
समाज कल्याण विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त लक्ष्मणराव वाघमारे यांच्या प्रतिक्षा या ज्येष्ठ कन्या आहेत. प्रतिक्षा उच्चशिक्षित असून राजकारणाची त्यांना आवड आहे. जितेश-प्रतिक्षा यांचं अॅरेंज मॅरेज आहे.

कोण आहेत जितेश अंतापूरकर?

  • जितेश अंतापूरकर हे देगलूर बिलोलीचे काँग्रेसचे आमदार आहेत
  • देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला
  • भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या विजयासाठी भाजपने जोरदार प्रचार केला पण
  • जितेश अंतापूरकर यांनी साबणे यांना अस्मान दाखवलं
  • रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने देगलूरची जागा रिक्त झाली होती
  • त्याच जागेवर काँग्रेसने जितेश यांना उमेदवारी दिली होती

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nanded deglur biloli vidhansabha congress mla jitesh antapurkar marriage with pratiksha waghmare
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here