Opposition Leader of Maharashtra | विरोधी पक्षनेता हा म्हणजे एकप्रकारे ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो, असे राजकारणात सर्रास म्हटले जाते. या पदाची ताकद आणि प्रभाव काय असू शकतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये दाखवूनच दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळणे, ही त्यांच्यासाठी आणखी एक मोठी संधी असू शकते.
हायलाइट्स:
- अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्याची मागणी
- या पदाला अजितदादांच योग्य न्याय देऊ शकतात
- शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत आमदारांकडून अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्याची मागणी करण्यात आली आहे. या पदाला अजितदादांच योग्य न्याय देऊ शकतात, असे मत आमदारांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कोण असेल, याचा निर्णय घेईल. विरोधी पक्षनेता हा म्हणजे एकप्रकारे ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो, असे राजकारणात सर्रास म्हटले जाते. या पदाची ताकद आणि प्रभाव काय असू शकतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये दाखवूनच दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळणे, ही त्यांच्यासाठी आणखी एक मोठी संधी असू शकते.
विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांनी सभागृहात जोरदार फटकेबाजी केली होती. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी आपल्या विरोधकांना शाब्दिक चिमटे काढले होते. त्यांनी राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांच्यासह राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली होती. अजित पवार यांच्या या भाषणामुळे या चर्चेचा चांगलीच रंगत आली होती.
‘एकनाथ शिंदे यांचं सरकार ६ महिन्यात कोसळू शकतं, मध्यावधी निवडणुकीला तयार राहा’
नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी अधिक समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या आलेलं सरकार सहा महिन्यात कोसळू शकते, त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp ajit pawar may get position of opposition leader of maharashtra ncp mla demands infornt of sharad pawar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network