याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून पौडच्या दिशेने एक फरशीने भरलेला ट्रक क्रमांक एम एच १२ के आर ७७०६ हा जात असताना पिरंगुट जवळ ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रकचे घाटात आल्यानंतर उताराच्या दिशेने रस्त्याने जाणाऱ्या तीन ते चार वाहनांना जोरात धडक दिली. मात्र, यात कोणतीही हानी झाली नाही.
मात्र, ट्रक लवळेफाटा इथे आल्यानंतर ट्रक चालकाने रस्त्याच्या डाव्या बाजूला वळवला. मात्र, त्या दिशेने जात असलेली दुचाकी ट्रकच्या खाली आली. दुचाकीवर असलेल्या पवन पटेल, पत्नी रेश्मा पवन पटेल, मुलगा रियांश पवन पटेल हे तिघेही बाईकवर होते. यावेळी पत्नी आणि मुलगा जागेवरच ठार झाले तर पटेल हे जखमी झाले. पवन पटेल यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच दुसऱ्या दुचाकीवर असलेले तानाजी विठ्ठल ढमाले हे देखील ट्रकखाली येऊन मृत्यू झाला.
सुदैवाने हा ट्रक ज्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्याने त्या ठिकाणी वाळूचा ढिगारा होता. त्या वाळूच्या अडथळ्यामुळे हा ट्रक जागेवरच उभा राहिला व पुढील आणखी मोठा अनर्थ टाळला. तातडीने नागरिकांनी चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, पौड पोलीस ठाण्यात ट्रक चालक शशिकांत बाबू मांडवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.