MNS vs Shivsena | शिवसेनेतून विधिमंडळातील आमदारांचा एक मोठा गट फुटून गेल्यामुळे पक्षाच्या अस्तित्त्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. शिवसेनेकडून सध्या आपल्या शाखाप्रमुखांकडून पक्षाशी बांधील राहीन, अशी प्रतिज्ञापत्रं लिहून घेतली जात आहेत.

 

MnS Shivsena
शिवसेना विरुद्ध मनसे

हायलाइट्स:

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रविवारी पुन्हा धक्का बसला
  • सचिवालयाने शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रतोदपदी भरत गोगावले यांचीच नियुक्ती वैध ठरवली
  • मनसेने शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे
मुंबई: राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात ३९ आमदार फुटल्यामुळे शिवसेनेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यापूर्वी शिवसेनेतून अनेक नेते बाहेर पडले होते. मात्र, यावेळी शिवसेनेतून विधिमंडळातील आमदारांचा एक मोठा गट फुटून गेल्यामुळे पक्षाच्या अस्तित्त्वाविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) शिवसेनेला डिवचायला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. शिवसेनेकडून सध्या आपल्या शाखाप्रमुखांकडून पक्षाशी बांधील राहीन, अशी प्रतिज्ञापत्रं लिहून घेतली जात आहेत. हाच धागा पकडत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.’बाबा, आपण शिवसैनिकांना शिवबंधनाऐवजी GPS ट्रॅकर बांधू’ असे आदित्य ठाकरे म्हणताना दिसत आहेत. आता या ट्विटला शिवसेनेकडून काही प्रत्युत्तर दिले जाणार का, हे आता पाहावे लागेल.

एकनाथ शिंदे गटाच्या खेळीनंतर शिवसेनेचा संताप

पक्षातील बंडाळीनंतर सत्ता गमावलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रविवारी पुन्हा धक्का बसला. कारण रात्री उशिरा विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रतोदपदी भरत गोगावले यांचीच नियुक्ती वैध ठरवली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपसह शिवसेनेच्या बंडखोर गटावर जोरदार टीका केली आहे. याविरोधात शिवसेनेकडून न्यायालयात धाव घेतली जाणार आहे.

विधानभवन परिसराला छावणीचे स्वरूप

राज्य विधिमंडळाच्या विशेष दोन दिवसीय अधिवेशनाला रविवारपासून मुंबईत सुरुवात झाली. या अधिवेशनासाठी विधान भवनाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदबोस्त ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसांबरोबरच राज्य राखीव दलाचे पोलिसही या बंदोबस्तात तैनात करण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून संपूर्ण विधान भवनाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंडखोर आमदार वास्तव्यास असणाऱ्या ताज प्रेसिडेंट ते विधान भवनाच्या संपूर्ण परिसराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. विधान भवनाच्या परिसरात अनेक खासगी वाहनांना प्रवेश नाकारण्यात येत होता. मंत्रालयापासून पोलिसांनी खासगी गाड्यांची तपासणी पूर्ण केल्यानंतर गाड्यांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात होती. मंत्रालय ते विधान भवनाच्या परिसरात कोणालाही उभे राहण्याची परवानगी दिली जात नव्हती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns leader sandeep deshpande slams shivsena uddhav thackeray aaditya thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here