जुन्नर ( पुणे) : जुन्नर शहरालगतच्या असलेल्या सोमतवाडी येथील पद्मावती तलावाच्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाय घसरून दोघेही तलावात पडले. तलावात गाळ असल्याने त्या गाळात अडकून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. रविवारी उशिरा ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे मृतदेह रुग्णलयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जुन्नर पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.