मुंबई : वर्गमैत्रिणीवर बलात्कार करुया, अशी भयानक चर्चा मुंबईत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर रंगल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या (आयबी) 13 ते 14 वर्ष वयोगटातील आठ विद्यार्थ्यांचं शाळेतून निलंबन (WhatsApp Chat on Classmate Rape) करण्यात आलं आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपमधील दोन विद्यार्थिनींच्या आईंच्या वाचनात हे चॅट आल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. धक्का बसलेल्या दोन्ही महिलांनी शाळेत धाव घेत, हा प्रकार शाळा प्रशासनाच्या कानावर घातला. त्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेत जाण्यासही नकार दर्शवला आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
नुकतंच हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उमटली आहे. देशातच नव्हे, तर राज्यातही बलात्काराच्या काही घटनांमध्ये आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलेलं आहे. अशातच 13-14 वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलं बलात्कार करण्यारख्या असंवेदनशील गप्पा मारत असतील, तर ते भयावह म्हणायला हवं.
हैदराबाद गँगरेप आरोपींकडून आधी नऊ महिलांची बलात्कार करुन हत्या?
संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये बरंच मोठं चॅट रंगलं होतं. विशेष म्हणजे त्यात ‘गँग बँग’ म्हणजेच सामूहिक बलात्कार आणि ‘रेप’ अशा शब्दांचा भरणा होता. वर्गमित्रांच्या शरीरयष्टीवरील भाष्य (बॉडी शेमिंग) किंवा त्यांना समलिंगी संबोधणं (गे, लेस्बियन) या गोष्टीही संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटमध्ये सुरु होत्या.
8 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ग्रुपवर या विषयी चॅट झालं होतं. सुरुवातीला अनेक मुलींभोवती रेंगाळणारं चॅट अखेरीस दोघींविषयी झालं. ‘आपण एका रात्री जाऊन बँग करुया’ अशा एका विद्यार्थ्याच्या कमेंटवर दुसऱ्यांनी होकार भरला. ‘मी तिला नष्ट करेन’ आणि ‘मी तिचं अस्तित्वच मिटवेन’ अशी हिंसक भाषाही त्यांच्या तोंडी दिसते. या प्रकरणाची शाळेने गंभीर दखल घेतली असून कायदेशीर कारवाईबाबत तपासणी (WhatsApp Chat on Classmate Rape) सुरु आहे.
I came to this site with the introduction of a friend around me and I was very impressed when I found your writing. I’ll come back often after bookmarking! safetoto
Of course, your article is good enough, baccarat online but I thought it would be much better to see professional photos and videos together. There are articles and photos on these topics on my homepage, so please visit and share your opinions.
When I read an article on this topic, casinosite the first thought was profound and difficult, and I wondered if others could understand.. My site has a discussion board for articles and photos similar to this topic. Could you please visit me when you have time to discuss this topic?