नागपूर : नागपूरमध्ये प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या तरुणाच्या खिशात असं काही सापडलं की यामुळे पोलिसांनाही धक्का बसला. खरंतर, प्रत्येक तरुणासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. स्टॅमिना वाढवण्यासाठी हल्ली बऱ्याच जाहिराती सुरू असतात, पण यातून तरुणाला जीव गमावण्याची वेळ आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर शहरात हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजय परतेकी असं तरुणाचं नाव आहे. तो प्रेयसीसोबत लॉजवर गेला असता अचानक बेशुद्ध पडला. काही कळण्याच्या आतच त्याचा मृत्यू झाला होता. अधिक तपास केला असता त्याने स्टॅमिना वाढवण्यासाठी गोळ्या खाल्ल्या असल्याचं समोर आलं आहे.

पुणे हादरलं! भरधाव ट्रकखाली बाईक चिरडली, आई आणि ६ महिन्याच्या बाळासह एकाचा मृत्यू
इतकंच नाहीतर अजयच्या खिशामध्येही स्टॅमिना वाढवण्याच्या गोळ्यांचं पाकिट सापडलं. यामुळे या गोळ्यांमुळेच अजयचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. गेल्या ३ वर्षांपासून अजयचं त्याच्या प्रेयसीसोबत रिलेशनशिप सुरू होतं. ते काही दिवसांमध्ये लग्नही करणार होते. पण यामुळे या घटनेमुळे प्रेयसीला मोठा धक्का बसला आहे.

फोटो काढण्यासाठी गेले ते परतलेच नाही, ‘या’ दोन हसऱ्या चेहऱ्यांसोबत घडला धक्कादायक प्रकार
दोघेही लॉजमध्ये गेले असता अजय बेशुद्ध झाला. यावर प्रेयसीने तातडीने त्याच्या मित्रांना बोलावून घेतलं पण तोपर्यंत त्याने प्राण गमावले होते. प्रेयसी ही २१ वर्षांची असून ती नर्स म्हणून काम करते. दरम्यान, अनेक डॉक्टर्स अशा स्टॅमिना वाढवणाऱ्या, शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या-औषधांच्या जाहिरातींना बळी न पडण्याचा सल्ला देत असतात. पण त्यावर दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार समोर येतात. त्यामुळे तरुणांमध्ये जनजागृती होणं महत्त्वाचं आहे.

हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here