या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आगीच्या लोळात मदतीची याचना करत आहे. त्याचवेळी महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याचं व्हिडिओमध्ये काही लोक बोलताना ऐकू येत आहेत. गंभीररीत्या जळलेल्या पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे.
जमिनीच्या वादातून घडली घटना
महिलेचा पती अर्जुन सहारिया याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो शनिवारी त्याच्या शेतात पोहोचला तेव्हा पत्नी जळालेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारिया कुटुंबाला ही जमीन राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनेंतर्गत फार पूर्वी देण्यात आली होती. ज्यावर नंतर पुढच्या जातीतील टवाळेखोरांनी ताब्यात घेतला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून पुढील तपास पोलीस करत आहेत.