Maharashtra Vidhan Sabha Floor Test: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उशीरा आल्याने त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. यापैकी काही आमदारांना दरवाजे बंद असल्याने सभागृहाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, शिरीष चौधरी, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांचा समावेश होता. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हेदेखील अगदी शेवटच्या क्षणी धावतधावत सभागृहात दाखल झाले.

हायलाइट्स:
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने १०७ मते होती
- बहुमत प्रस्तावाविरोधात मतदान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या ९९ इतकीच होती
- सभागृहाच्या प्रथेप्रमाणे सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले
ज बहुमत प्रस्तावावर मतदान झाले तेव्हा सभागृहाच्या प्रथेप्रमाणे सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उशीरा आल्याने त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. यापैकी काही आमदारांना दरवाजे बंद असल्याने सभागृहाबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, निलेश लंके, शिरीष चौधरी, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांचा समावेश होता. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव हेदेखील अगदी शेवटच्या क्षणी धावतधावत सभागृहात दाखल झाले. अनेक आमदार बहुमत प्रस्तावावरील मतदानाला गैरहजर असल्याने सभागृहातील महाविकास आघाडीच्या मतांची संख्याही कमी झाली. काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने १०७ मते होती. मात्र, आज बहुमत प्रस्तावाविरोधात मतदान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या ९९ इतकीच होती.
शिवसेना आमदारांनी ‘ईडी-ईडी’ चिडवताच प्रताप सरनाईकांचा इशारा
शिंदे-फडणवीस सरकार सोमवारी विधानसभेत बहुमत प्रस्तावाला सामोरे गेले. बहुमत प्रस्तावावर मतदान सुरु असताना शिवसेनेकडून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला. काल विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान सुरु असताना यामिनी जाधव आपला क्रमांक उच्चारण्यासाठी जागेवर उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेना आमदारांकडून ‘ईडी-ईडी’चा गजर करण्यात आला होता. आज ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक मतदानासाठी आपल्या जागेवर उभे राहिले तेव्हादेखील शिवसेना आमदारांकडून त्यांना ‘ईडी-ईडी’ चिडवण्यात आले. तेव्हा प्रताप सरनाईक यांनी शांत न राहता तात्काळ शिवसेना आमदारांना प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांच्या दिशेने बघत ‘तुम्हाला अर्ध्या तासात प्रत्युत्तर देतो’ असे म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network