पूर्णा शहरातील कृषी निविष्ठा व्यापारी रमाकांत भिमराव कदम व त्यांचे मित्र सभापती अशोक बोकारे हे रविवार दि. ३ जुलै रोजी सायं सहा वाजेच्या सुमारास स्टेट बँकेजवळ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका एस. बी. आय एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी एटीएम कार्डचा वापर करून एटीएममधून दहा हजार रुपये काढण्यासाठी कार्ड वापरले.
प्रक्रिया पूर्ण होऊन शेवटी एटीएम मशीनमधून पाचशे रुपये किंमतीच्या २० चलनी नोटा त्यांच्या हातात पडल्या. या नोटांमध्ये सुमारे १३ ते १४ चलनी नोटा या चलनातून बाद होत असलेल्या अर्धवट जळालेल्या, फाटलेल्या, कुजलेल्या, शाई सांडलेल्या, रंग उडालेल्या अवस्थेत आढळून आल्याने रमांकात कदम अक्षरश: चक्रावले.
एकदंरीत हा प्रकार नेमका कसा घडला? याबाबत सविस्तर माहिती देत एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या कंपनीकडून चुक होण्याची शक्यता समोर येत आहे. या प्रकरणात चौकशी केली जाईल व तुमचे अर्थिक नुकसान होऊ देणार नाही. तुम्हाला तुमच्या नोटा बदलून दिल्या जातील असा विश्वास शाखा अधिकारी गोपाळ काटोळे यांनी ग्राहकांना दिला.
हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल