मुंबई: राज्यातील सत्तानाट्य, राजकारणावर वेळोवेळी प्रतिक्रिया देणारे आणि मार्मिक, हटके शैलीत भाष्य करणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane)पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळं चर्चेत आले आहेत.

“ED ऑफिसमधून बोलतोय” अभिनेते किरण मानेंची फेसबुक पोस्टमधून, हिंदुत्वावरुन तिरकस बाण
किरण माने यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असेलल्या सत्तानाट्यावर वेळोवेळी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या पोस्टनेहमीच चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी शेअर केलेली तिरकस आणि हटके पोस्ट व्हायरल होत आहे.
“ED ऑफिसमधून बोलतोय” अभिनेते किरण मानेंची फेसबुक पोस्टमधून, हिंदुत्वावरुन तिरकस बाण

काय आहे किरण मानेंची ही पोस्ट?

साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात !

अशी ही तिरकस पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

फेसबुक पोस्ट

कोण आहेत किरण माने?
अभिनेते किरण माने हे मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटीलच्या भूमिकेत दिसले होते. मात्र अचानक त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे त्यांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here