“शिवसेनेचे जे आमदार माझ्याकडे आले, त्यांना मी कधी मोकळ्या हाताने परत पाठवलं नाही. निधी दिला म्हणजे उपकार केला नाही, पण मी भेदभाव करणारा माणूस नाही, हे मला सांगायचंय. पण माझी आणि राष्ट्रवादीची जी बदनामी होत आहे, ती आमदारांनी थांबवावी. जरा खरं बोलावं”, अशा शब्दात अजित पवारांनी बंडखोरांना खडसावलं.
अजित पवार यांनी बंडखोर आमदारांना दिलेल्या निधीची यादीच वाचून दाखवली.
दादाजी भुसे ३०६ कोटी
गुलाबराव पाटील ३०९ कोटी
शंभुराज देसाई २९४ कोटी
अब्दुल सत्तार २०६ कोटी
अनिल बाबर २८६ कोटी
महेश शिंदे १७० कोटी
शहाजीबापू पाटील १५१ कोटी
महेंद्र थोरवे १५४ कोटी
अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला असा पाढा अनेकांनी वाचला. मी काम करताना भेदभाव कधीच करत नाही हे तुम्हाला माहितीय. आमदार निधी मीच दोन कोटी रुपयांवर नेला. २८८ आमदारांना सगळे पैसे मिळाले पाहिजे हा माझा प्रयत्न होता. कसलाच भेदभाव केला नाही. तुम्ही सातत्याने अन्याय केला असं म्हणता. शिंदेसाहेब आपण खाजगीत बोलत होतो. पुरवणी मागण्यांमध्ये नगरविकास खात्याला अजून निधी देण्याचा मी शब्द दिला होता. सर्व खात्यांना पुरेसा निधी दिला. शिवभोजन थाळी केंद्राच्या वेळीही शिवसेना आमदारांच्याच सर्वाधिक शिफारशी मान्य केल्या.मग माझं काय चुकलं”
१०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, ४० आमदाराची व्यक्ती मुख्यमंत्री होते, नक्की काळबेरं आहे!
“नेत्याबरोबर शिवसैनिक जात नाहीत हा इतिहास आहे. येत्या निवडणुकीत ते दिसेलच.. पण एका गोष्टीचं कुतुहल आहे.. ज्या वेळेस भाजप आणि शिंदे गट यांनी सरकार स्थापन करायचं ठरवलं, त्यावेळी १०६ आमदार असलेली व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, ४० आमदाराची व्यक्ती मुख्यमंत्री होते.. त्यात नक्की काही तरी काळंबेरं आहे.. भाजपचे आमदार भविष्यात शिंदेंच्या मंत्र्यांना बोलायला मागे पुढे पाहणार नाहीत.. आमच्यामुळे तुमचं सरकार आहे असं म्हणतील”