मुंबई : एकनाथराव भाजपवाले शिवसेना विरुद्ध शिवसेना लढवत आहेत. पण यात शिवसेनेचा रक्तपात होईल, शिवसेना संपेल, अशी मला भीती आहे. शिवसेना संपविण्याचा भाजपचा २५ वर्षांचा इतिहास आहे. सेना संपवणं हा यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तुम्ही मुख्यमंत्री झालात, आम्हाला आनंद आहे, पण शिसेना वाचवण्यासाठी दोन पाऊले मागे या. महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल, अशी आर्त साद शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना सभागृहात घातली.

एकनाथ शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनपर भाषण करायला भास्कर जाधव उभे राहिले. लोकशाहीत दुसरा आवाज देखील महत्त्वाचा आहे, अशी फडणवीसांच्या वक्तव्याची आठवण करुन देताना माझं बोलणं तुम्ही ऐकू घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करत भास्कर जाधव भाजपवर तुटून पडले.

संतापलेल्या भास्कर जाधवांनी भाजपने ‘पावन’ करुन घेतलेल्या ४५ नेत्यांची लिस्टच काढली
एकनाथ शिंदे माझे जवळचे मित्र आहेत. गेल्या आठ दिवसात मी झोपलेलो नाही. (गोळी घ्या असा आमदार प्रकाश सुर्वे सल्ला).. मी विचलित आहे. मी अस्वस्थ आहे.. एकनाथ शिंदे आजही सभागृहात सांगतात की मी शिवसेनेचा आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आजही सांगतात की आनंद दिघेंचा वारसदार आहे. मी सुद्धा ते मान्य करतो. मला एकनाथ शिंदेंना सांगायचंय, तुमच्यावर मोठी जबाबदारी आलीय, तुम्ही शिवसेना प्रमुखांचं नाव घेता. आपली एवढी उठबस नाही, जास्त भेट नाही.. तरी देखील तुमची लोकांना मदत करण्याची जी पद्धत बघितली ती भावली. कोकणातल्या महापुरात तुम्ही चांगली मदत केली हे मान्य करतो. लोकांसाठी धावून जाता ही वस्तुस्थिती आहे. आपलं काम मी जवळून पाहिलंय.

‘वर्मावर घाव पडतोय’ म्हणत भास्कर जाधव गरजले; एका-एका बंडखोराचं नाव घेत तुटून पडले!
भास्कर जाधव म्हणाले, “या शिवसेनेत एका बाजूला ४० शिलेदार तुमच्यासोबत आहेत, तर दुसऱ्या बाजूला उरलेले शिवसैनिक शिवसेना वाचवायला उभे आहेत. कोण कुणावर घाव घालणार आहे.. कोण कुणाला घायाळ करणार आहे आणि कोण कुणाला धारातिर्थी पाडणार आहे याचा विचार करा. माणसाने एकदा लढा पुकारला तर लढाई लढण्यापूर्वी थांबायचं कुठे हे ज्याला कळतं तोच खरा यशश्वी नेता. तुमच्या मनातले अनेक दुःख असतील ते मांडा तुम्ही.. पण महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे”.

बंडखोर आमदारांना अजितदादांचं रोखठोक उत्तर, विधानसभेत दिलेल्या निधीची यादीच वाचली!
“एकनाथराव भाजपवाले शिवसेना विरुद्ध शिवसेना लढवत आहेत. पण यात शिवसेनेचा रक्तपात होईल, शिवसेना संपेल, अशी मला भीती आहे. शिवसेना संपविण्याचा भाजपचा २५ वर्षांचा इतिहास आहे. सेना संपवणं हा यांचा एककलमी कार्यक्रम आहे. तुम्ही मुख्यमंत्री झालात, आम्हाला आनंद आहे, पण शिसेना वाचवण्यासाठी दोन पाऊले मागे या. महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here