अमरावती : अमरावतीचे केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर आता अनेक खुलासे समोर येत आहेत. अशात आता त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. चाकू हल्ल्यामुळे उमेश यांच्या मेंदूला इजा झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. इतकंच नाहीतर त्यांच्या श्वासोच्छवासाची नळी, अन्नाची नळी आणि डोळ्याच्या नसांनाही चाकूने वार केल्यामुळे गंभीर इजा झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेशच्या मानेवर सापडलेली जखम पाच इंच रुंद, सात इंच लांब आणि पाच इंच खोल असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. ५४ वर्षीय केमिस्ट उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती आणि याप्रकरणी मास्टर माइंडसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये कन्हैयालाल या टेलरच्या हत्येच्या आठवडाभर आधी ही घटना घडली होती.
Amravati Killing CCTV Footage: ५ कॅमेऱ्यातील CCTV मधून उमेश कोल्हेंच्या हत्येचा उलगडा, आधी बेदम मारहाण, त्यानंतर गळा…

ब्लॅक फ्रीडम नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये केला होता मेसेज शेअर

उमेश कोल्हे हे अमरावती शहरात मेडिकल स्टोअर चालवायचे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ त्यांनी काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांनी चुकून एका ग्रुपमध्ये पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये काही मुस्लिमदेखील सदस्य होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेशने ब्लॅक फ्रीडम नावाच्या ग्रुपमध्ये नुपूर शर्माला सपोर्ट करणारा व्हॉट्सअॅप मेसेज शेअर केला होता.

उमेशचा मित्र युनूस खान हा देखील ब्लॅक फ्रीडम नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंधित होता. युनूस खानने उमेशने शेअर केलेली पोस्ट रेहबरिया ग्रुपला पाठवली होती, ज्यामध्ये हत्येचा मुख्य आरोपी इरफान खानही संबंधित होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी इरफान खानने उमेशच्या हत्येचा कट रचला आणि यासाठी लोकांना सहभागी करून घेतले. इरफान खानने इतर पाच आरोपींना १० हजार रुपये आणि पळून जाण्यासाठी एक कार देण्याचे आश्वासन दिलं होतं.

Nagpur News: स्टॅमिना वाढवायच्या गोळ्या खाऊन तरुण प्रेयसीसोबत गेला लॉजवर, आधी बेशुद्ध पडला अन्….
मेडिकल स्टोअरवरून परतत असताना केली हत्या

२१ जून रोजी रात्री १० ते १०.३० च्या दरम्यान उमेश दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतत असताना हा खून झाला. यादरम्यान उमेशचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी हे त्याच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवरून जात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हे महिला महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच मागून दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी उमेशचा रस्ता अडवला. दुचाकीवरून उतरलेल्या तरुणाने त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात उमेश हे रस्त्यावर पडले होते. यानंतर संकेतने त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.

हेही पाहा – तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल

दरम्यान, उमेश कोल्हे खून प्रकरणी पोलिसांनी शेख इरफान, मुदस्सीर अहमद (२२), शाहरुख पठाण (२५), अब्दुल तौफिक (२४), शोएब खान (२२), अतीब रशीद (२२) आणि युसूफ खान बहादूर खान (४४) यांना अटक केली आहे.

Udaipur Murder: कन्हैयाच्या शरीरावर २६ चाकूचे वार, १३ जागी अवयव कापले; शवविच्छेदन रिपोर्टमध्ये खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here