या काळात एखादं मत, प्रतिक्रिया मांडण्यासाठी सोशल मीडिया हे एक माध्यम झालं आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण खात्याची जबाबदारी असणारे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Instagram) देखील सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्यासह फोटो पोस्ट केला होता. या फोटोची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा यावर आलेल्या कमेंट्सची झाली. सिनेसृष्टीतील विविध कलाकारांनी या फोटोवर कमेंट केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या पोस्टवरील एका कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतलंय. एका अभिनेत्रीची ही कमेंट आहे, जिने आदित्य यांच्या फोटोवर पाच हार्ट पोस्ट केले आहेत.
हे वाचा-लवकरच पुन्हा भेटू असं म्हणत माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील विश्वजित काकांनी घेतला ब्रेक
काय आहे आदित्य ठाकरेंची पोस्ट?
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ते उद्धव ठाकरे यांच्या मागोमाग चालत येत आहेत. ‘योग्य पावलांमागे चालणं नेहमी महत्त्वाचे आहे. आमच्या मार्गावर मिळणाऱ्या तुमच्या प्रेमासाठी आणि आशीर्वादांसाठी सर्वांचा ऋणी आहे, हीच आमची खरी ताकद’.

हे वाचा-पावसाच्या सरींसारखीच इन्स्टाग्राम रील्सची बरसात! कलाकार एन्जॉय करतायंत मान्सून
आदित्य यांची मनोरंजन विश्वातील विविध व्यक्तींशी असणारी ओळख सर्वश्रुत आहे. या वर्गाकडून मोठा पाठिंबा त्यांना अनेकदा मिळाला आहे. त्यामुळे या अभिनेत्रीची त्यांच्या पोस्टवरील कमेंट लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर, अभिनेते, राजकीय नेते इ. लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री अहाना कुम्राने ही पोस्ट केली आहे. अहानाने पाच हार्ट्सची इमोजी या पोस्टवर केली आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्सही येत आहेत.