मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना सत्तांतर, त्यामागील भूमिका याविषी भाष्य केलं. माझं गेल्या अडीच वर्षात खच्चीकरण करण्यात आलं असं शिंदे म्हणाले.

 

Eknath Shinde cm
एकनाथ शिंदे

हायलाइट्स:

  • माझ्या पाठिशी उभं राहणाऱ्या आमदारांचे आभार
  • सत्तेच्या मोहापायी बंड केलं नाही
  • माझं खच्चीकरण करण्यात आलं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिलं. महाराष्ट्रातील दीन दुबळ्या घटकांची प्रगती व्हावी, अशी प्रार्थना करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादानं शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं आहे. माझ्यासोबत गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेचे ४० आणि छोट्या पक्षांचे १० आमदार माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस केलं त्यांचं अभिनंदन करतो,असं एकनाथ शिंदे म्हणाले. मला आता हे वाटत नाही विश्वास बसत नाही, मी मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, कारण आज आपण पाहिलं महाराष्ट्रातील अनेक घटना पाहिल्या तर लोकप्रतिनिधी असतील, खासदार, आमदार, नगरसेवक असतील. ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जातात. देवेंद्र फडणवीसांनी मला या घटनेची ३३ देशांनी नोंद घेतल्याचं सांगितलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. सत्तेमध्ये मी नगरविकास मंत्री होतो. गुलाबराव पाटील ते उदय सामंत ही लोक मंत्री होती. स्वत: चं मंत्रिपद डावावर लावून ४० आमदार आणि १० आमदार होते. पुढं बलाढ्य सरकार, पुढं बसलेली मोठी माणसं असताना दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचा आणि दिघेंचा सैनिक होतो, आम्ही कुठं जातोय याबद्दल कुणी विचारलं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात’, गुलाबरावांचा राऊतांवर प्रहार
मला ज्या पद्धतीनं वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार हे आमदार आहेत आणि पुढे बसलेले आमदार आहेत. अन्याय झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणं बंड आणि उठाव केला. आमच्या आमदारांनी मला विचारलं नाही की मुख्यमंत्र्यांना भेटून पुढं जाऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले. हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही, सुनील प्रभू यांना देखील माहिती आहे की कशा प्रकारे खच्चीकरण करण्यात आलं. मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं, तुम्ही अजिबात चिंता करु नका, तुमच्या निवडणुकीची, तुमचं नुकसान होत असेल असं वाटत असेल तर मी या जगाचा निरोप घेईन, असं सांगितल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
मी पुन्हा आलो… ज्यांनी टिंगल केली त्यांचा बदला घेणार | देवेंद्र फडणवीस
मला बेकायदेशीरपणे गटनेते पदावरुन टाकण्यात आलं. पुतळे जाळण्यात आले. मी ३० ते ३५ वर्षे रक्ताचं पाणी केलं आहे. मी १७ व्या वर्षी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं भारावलो होतो. आनंद दिघेंची भेट झाली आणि शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मी १९९७ ला नगरसेवक झालो, दिगंबर धोत्रे हा तिथला भाजपचा कार्यकर्ता होता मी त्याला १९९२ ला तिकीट देण्यात आलं मी पाच वर्ष थांबलो. शाखाप्रमुख पदापासून काम सुरु केलं, मी पदाचा विचार केला नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राजसाहेब तुमच्या इतकी शब्दसंपदा नाही, भेटायला येतो – देवेंद्र फडणवीस
मी शांत असतो, अन्याय होतो त्यावेळी शांत नसतो. बाप काढले, माझाही बाप जिवंत आहे. माझी आई गेली, उद्धवसाहेबांना आईनं माझ्या बाळाला सांभाळा म्हणून सांगितलं. मी जेव्हा घरी जायचो तेव्हा माझी आई झोपलेली असायची, पंधरा दिवसानं घरी जायचो. मी बाप म्हणून श्रीकांतला वेळ देऊ शकलो नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. माझी दोन मुलं माझ्यासमोर रडली त्यावेळी मला आधार आनंद दिघे यांनी आधार दिला, असं बोलताना एकनाथ शिंदेना अश्रू अनावर झाले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cm eknath shinde said which thing told to rebel mlas during maharashtra political crisis
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here