इतकंच नाहीतर यावेळी साला या शब्दावरुन सभागृहात जोरदार हशा झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो शब्द मागे घेतला. दरम्यान, यावेळी निधी वाटपाची एक चिठ्ठी एकनाथ शिंदेंना मिळली. ती चिठ्ठी फेकत हा विषय संपला असं शिंदे म्हणाले. यावरूनही सभागृहात सगळे जोरदार हसले. खरंतर, अनेक दिवसांची खदखद आज मुख्यमंत्री बोलून दाखवत आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवर अजित पवारांनाही चिमटे काढले.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
संजय पवार यांच्यासाठी तीन मतं मी बाहेरुन आणली
संजय पवार यांच्यासाठी तीन मतं मी बाहेरुन आणली होती. सगळ्यांनी ते पाहिलं.. राज्यसभेनंतर विधानपरिषद निवडणूक होती. शिवसेनेचे दोन निवडून आणण्यासाठी तयारी केली. मी जाताना सगळी तयारी केली, लोकेशन काढून नाकाबंदी केली.. पण नाकाबंदीतून कसं निघायचं हे मलाही कळतं.. जे काही घडलं त्यामागे एक विचार आहे. इतर धर्मियांचा आम्ही सन्मान करु हे मी इथे सांगतो.
नितीन देशमुखला विमानाने पाठवलं…
संतोष बांगर मला बोलायला घाबरत होता.. पण त्याने रात्री दीड वाजता फोन केला.. मला यायचंय सांगितलं.. आणखी तीन ते चार लोक आहेत आणि त्यांचं मत असंच असल्याचं ते म्हणाले. आईची तब्येत खराब असल्याचं सांगून नितीन देशमुखला विमानाने पाठवलं. सुरुवातीला २० लोक होते, नंतर मर्जीने ४० झाले.
हिंदुत्वाची ताकद एकत्र आली
हिंदुत्वाची ताकद एकत्र आली तर २०० लोक निवडून येतील हे केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं. वेगळे राहिलो तर अजित दादांनी १०० प्लसचं टार्गेट ठरवलंच होतं. यामुळे आमच्या सगळ्यात चलबिचल होती. आमचे चंद्रकांत पाटील खडसेंच्या आणि पोलिसांच्या भीतीने सहा महिने बाहेरच आहेत. पण आता फडणवीस आणि मी आहोत, घाबरायचं कारण नाही असं त्यांना सांगितलं.
उद्धव साहेबांशी बोलण्याचा मी ५ वेळा प्रयत्न केला…
आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक कशी जिंकू या चिंतेत सगळे होते. आमदार नेहमी म्हणायचे भाजप आपला नैसर्गिक मित्र आहे. आपण हे काय करतोय असं आमदार म्हणायचे. उद्धव साहेबांशी बोला अशी आमदारांची मागणी होती. मी पाच वेळा हा प्रयत्न केला.. केसरकर याचे साक्षीदार आहेत. पण आम्हाला यश मिळालं नाही. हे करत असताना जी अडीच वर्ष गेली, त्यात जो अनुभव आला.. त्यात सावरकरांविषयी बोलू शकत नाही, सभागृहात गप्प रहावं लागलं… दाऊदशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करु शकलो नाही, संभाजीनगर नामकरण करु शकलो नाही, नंतर निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे.. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू.. कधीच विचारांशी तडजोड होणार नाही. शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार कुणी काढला होता हे सर्वांना माहितीय.. १९९९ पासून पुढे सहा वर्ष त्यांना मतदान करु दिलं नाही. काँग्रेसने तक्रार केली होती. अशा हिंदुत्वाला नेहमी विरोध करणाऱ्या पक्षासोबत कसं बसायचं..