केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवं सरकार लवकारत लवकर पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 

maharashtra Cm Eknath shinde big Annoucement Shinde fadanvis Government Will reduce VAT on petrol
एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री)
मुंबई : पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार घेणार असल्याची मोठी घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवं सरकार लवकारत लवकर तो निर्णय घेईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकमाथ शिंदे यांच्या भाषणातील ३ मोठ्या घोषणा

राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : maharashtra cm eknath shinde big annoucement shinde fadanvis government will reduce vat on petrol
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here