काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. त्या बैठकीत अजितदादांच्या नावाची निवड झाली. त्यामुळे आता विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी अजित पवारांच्या खांद्यावर असणार आहे.

अनेक वर्ष सरकारमध्ये काम केल्याने प्रशासनाची नस अन् नस अजित पवारांना माहिती आहे. आपल्या रोखठोक आणि मुद्देसूद भाषणाने सरकारला कोंडीत पकडण्याचा वारंवार प्रयत्न करु शकतात. सध्या राष्ट्रवादीकडे अनुभवी नेत्यांची फौज आहे. तसेच भावनिक साद घालणारे प्रसंगी आक्रमक रुप धारण करणारे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव शिवसेनेकडे आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो. कधीही सभागृहात बोलत असताना त्यांचा शब्द इकडचा तिकडे होत नाही. १९९१ मध्ये खासदार म्हणून निवडून आले. राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. सगळ्यात जास्त जमिनीवर पकड असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. बोलण्याची ढब आहे, त्यामधून कोट्या करायची गरज लागत नाही. शरद पवारांना धन्यवाद. हे सभागृह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचं, सत्ताधारी पक्षाएवढाच विरोधीपक्षालाही मान-सन्मान आदर असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित पवारांची राजकीय कारकीर्द
- १९९१ मध्ये अजित पवार हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले
- त्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांची विधानसभेत एन्ट्री
- ते बारामती मतदारसंघातून ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत
- यादरम्यान त्यांनी ऊर्जामंत्री, अर्थमंत्री, जलसंपदामंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवली आहेत
- विरोधीपक्षातही प्रदीर्घ काळ काम केल्याचा त्यांना अनुभव आहे
- प्रशानसनाची नस् न नस् त्यांना माहितीये
- अधिकाऱ्यांवर वचक असणारा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं
- त्यांनी आतापर्यंत ४ वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे
विधानसभेत अजित दादांनी बंडखोर आमदारांना दिलेल्या निधीची यादीच वाचली!