Authored by Maharashtra Times | Updated: Jul 4, 2022, 7:49 PM

भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे मोठे आव्हान दिले. त्यानंतर भारतीय संघाचा विजय निश्चित समजला जात होता. कारण एवढी मोठी धावसंख्या हातात असताना भारताचे गोलंदाज कमाल करतील, असे वाटत होते. पण यावेळी भारताचा नवा कर्णधार जसप्रीत बुमराकडून मोठी चूक घडली आणि त्याचा फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. बुमराकडून यावेळी कोणती मोठी चूक घडली, पाहा…

 

जसप्रीत बुमरा (सौजन्य-ट्विटर)

हायलाइट्स:

  • भारताचा कर्णधार जसप्रीत बुमरा मैदानात उतरला आणि त्याच्याकडून मोठी चूक घडली.
  • भारतीय संघ गोलंदाजी करत असताना ही चूक झाली.
  • बुमराच्या चुकीचा फटका भारताला कसा बसला, पाहा…
बर्मिंगहम : भारतीय संघाने दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी केली आणि इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे मोठे आव्हान दिले. पण इंग्लंडला एवढे मोठे आव्हान दिल्यावर भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराकडून मैदानात एक मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले आणि त्याचा फटका भारतीय संघालाही बसला.
जसप्रीत बुमराकडून मैदानात कोणती मोठी चूक घडली, पाहा…
भारताकडे बचाव करण्यासाठी ३७८ धावा होत्या, त्यावेळी संघ जोरदार आक्रमण करेल असे वाटत होते. या डावाच्या सुरुवातीला जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी गोलंदाजी केली. अनुभवानुसार या दोघांनी गोलंदाजी केली असली तरी त्यांना विकेट मिळवण्यात मात्र अपयश आले होते. त्यानंतर मात्र बुमरा कोणती चाल खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण बुमरा आणि शमी यांनी सुरुवातीला फक्त ९ षटके गोलंदाजी केली होती आणि चेंडू तसा नवीनच होता. त्यावेळी बुमरा हा मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना गोलंदाजीला आणेल, असे वाटले होते. कारण शार्दुलचा जमलेली जोडी फोडण्यात हातखंडा आहे आणि भारताला विकेटची नितांत गरज होती. पण बुमराने त्याला गोलंदाजीला आणले नाही. त्याचबरोबर पहिल्या डावात मोहम्मद सिराजने भेदक मारा केला होता, त्यामुळे बुमरा तिसरा गोलंदाज म्हणून सिराजला आणेल, असे वाटत होते. पण बुमराने ही गोष्ट केली नाही.

बुमराने तिसरा गोलंदाज म्हणून शार्दुल किंवा सिराजच्या हाती चेंडू न देता फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू दिला आणि चूक केली. कारण जडेजाच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना यावेळी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी केला. त्याचबरोबर या डावात स्थिरस्थावर होण्यासाठी इंग्लंडच्या सलामीवीरांनी जडेजाच्या गोलंदाजीचा चांगला वापर केला. त्यामुळे जडेजाला लवकर गोलंदाजी देत बुमराने यावेळी मोठी चूक केल्याचे पाहायला मिळाले. इंंग्लंडचे दोन्ही सलामीवीर आता चांगलेच स्थिरस्थावर झाले आहेत आणि ते धडाकेबाज फटकेबाजीही करत आहेत. त्यामुळे आता ही जोडी भारताचा कोणता गोलंदाज फोडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : jasprit bumrah made big mistake after given big target to england, a big blow to india
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here