भारतीय चाहते विराट कोहलीला साकडं का घालत आहेत, जाणून घ्या…इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतक ओलांडले तरी भारताला विकेट मिळत नव्हती. भारताला पहिली विकेट मिळाली तेव्हा इंग्लंडच्या १०७ धावा झाल्या होत्या. त्यानंतर भारताने इंग्लंडची ३ बाद १०९ अशी अवस्था केली होती, याचाच अर्थ भारताने इंग्लंडला फक्त दोन धावांत तीन धक्के दिले होते. त्यानंतर भारतीय संघ विजय मिळवू शकतो, अशी आशा चाहत्यांच्या मनात पल्लवित झाली. पण त्याचवेळी चाहत्यांनी कोहलीच्या एका गोष्टीचा धसका घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण कोहलीकडून पहिल्या डावात एक मोठी चूक घडली होती.
विराट कोहलीकडून कोणती चूक घडली होती, जाणून घ्या…पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने शतक झळकावले, हे सर्वांनाच माहिती आहे. पण जॉनीला मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजी करता येत नव्हती, तो बऱ्याचदा चुकत होता. त्यावेळी कोहली आक्रमक झाला आणि त्याला फलंदाजी कशी करायची हे शिकवायला गेला. कोहलीने यावेळी जॉनीला डिवचले. जॉनीही यावेळी शांत बसला नाही आणि कोहलीला भिडल्याचे पाहायला मिळाले. पण या सर्व गोष्टीचा परीणाम जॉनीच्या फलंदाजीवर झाल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर जॉनीने मैदानात आक्रमकता दाखवली आणि भारताच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. जॉनीने त्यानंतर धडाकेबाज शतकही झळकावले. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात फॉलोञनची नामुष्की टाळता आली होती. त्यामुळे कोहलीने जर पुन्हा एकदा जर इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला डिवचले आणि तो आक्रमकपणे खेळायला लागला तर त्याचा फटका भारताला पुन्हा बसू शकतो. त्यामुळे भारताच्या विजयासाठी कोहलीने शांत राहणेही गरजेचे आहे.