Maharashtra Mumbai Rains :  मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. 

रायगड रत्नागिरीमध्ये NDRF च्या टीम तैनात

राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. 

कोकणासह विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील सांगण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. 

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही मुसळधार पावासाचा इशारा

उत्तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. याबरोबरच 6 आणि 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

  1. Excellent response tіme; the assistance prоvided by Anthony ѡaѕ fantastic; this іs
    importаnt to me ѕince I’m confident that support staff ѡill
    be aЬle to look into mү issues promptly if they ɑre raised,
    and ressolve them.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here