मलंगगड येथे पर्यटनासाठी अनेक तरुण जातात. कल्याणजवळचा हा डोंगराळ भाग मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे मुंबईतील अनेक तरुण इथे पर्यटनासाठी अनेकदा तरुण भरकटतात. यामुळे त्यांच्यासाठी बचाव मोहीम राबवावी लागते. पण आता एका गायीच्या वासरासाठी तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवले.

 

malang gad kalyan rescue operation for cow cub
मलंगगड येथील ‘रेस्क्यू ऑपरेशन’ व्हायरल, दरीत अडकलेल्या गायीच्या वासराला जीवनदान…
कल्याण : मलंगगडच्या डोंगरावर अडकलेल्या एका गायीच्या वासराला वाचवण्यात तरुणांना यश आले आहे. काकडवाल गावातील तरुणांनी या वासराला जीवनदान दिले आहे. त्यामुळे सध्या या तरुणांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या ‘रेस्क्यू ऑपरेशन’चा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

कल्याणजवळील मलंगगडच्या मागील बाजूस वावंजे परिसरातील दरीत गायीचे वासरू अडकल्याची माहिती काकडवाल गावातील तरुणांना मिळाली. यानंतर काकडवाल गावातील तरुणांनी त्या वासराला वाचवण्यासाठी धाव घेतली. अखेर अथक प्रयत्नांनंतर या तरुणांनी या वासराला बाहेर काढले आहे. चार दिवसांपासून हे वासरू अडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर दहा ते पंधरा तरुणांनी या वासराचे जीव वाचवल्याने या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान या ‘रेस्क्यू ऑपरेशन’ व्हिडिओ व्हायरल होत आहे. काकडवाल गावातील मिन्नत पावशे, कदम साळवी, जयसूर्या पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वासराला जीवदान दिले.

ट्रेकिंग करताना मुंबईतील तरुण बदलापूरच्या चंदेरी गडावरून दरीत कोसळला अन् २२

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : malang gad kalyan rescue operation for cow cub
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here