Shivsena Pune leader nana bhangire | भानगिरे यांना विधानपरिषद आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची देखील शक्यता आहे. याचीच फिल्डिंग लावण्यासाठी पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत पोहचले असून आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण देखील दिल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे.
हायलाइट्स:
- शिवसेनेचे बडे नेते देखील शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे
- पुण्यातील बडे नाव असणारे नाना भानगिरे हे देखील शिंदे गटात सामील
- हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे
आता फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे बडे नेते देखील शिंदे गटात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. आधी माजी मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते विजय शिवतारे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला होता आणि आता पुण्यातील बडे नाव असणारे नाना भानगिरे हे देखील शिंदे गटात सामील झाल्याने आगामी काळात हा ओघ आणखी वाढण्याची शक्यता आहे. हडपसर भागात भानगिरे यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे भानगिरे यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.
हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. भानगिरे यांना विधानपरिषद आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची देखील शक्यता आहे. याचीच फिल्डिंग लावण्यासाठी पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत पोहचले असून आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण देखील दिल्याची माहिती आहे.दरम्यान, येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुणे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : cm eknath shinde one more setback to uddhav thackeray shivsena pune leader nana bhangire will join eknath shinde camp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network