ashok saraf at chala hawa yeu dya, अशोक सराफ यांना अशी वागणूक का? ‘चला हवा येऊ द्या’वर प्रेक्षक भडकले – audience is unhappy with nilesh sable’s show chala hawa yeu dya for discrimination between marathi and bollywood artists
मुंबई: ‘चला हवा येऊ द्या’ हा शो नेहमीच चर्चेत असतो. मराठी मालिका, चित्रपट, नाटकांचं प्रमोशन करण्यासाठी अनेक दिग्गज कलाकार या मध्ये हजेरी लावतात. तसंच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचं प्रमोशनही या शोमध्ये करण्यात आलं आहे. पण अनेकदा या हा शो वादात अडकला आहे. शोमध्ये तोच तो पण आल्याचंही प्रेक्षकांनी म्हटलं होतं. तर आता या शोमध्ये मराठी कलाकारांनाच दुय्यम वागणूक दिल्याचंही म्हटलं जात आहे.
पंढरपूरला आल्यावर आजोबा भेटले, उत्कर्ष शिंदेची पोस्ट वाचून चाहत्यांचे डोळे पाणावलेगेल्या महिन्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसंच पाच दशके त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. याच निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील अशोक सराफ यांच्यासाठीचा खास एपिसोड प्रेक्षकांनी पाहिला. पण या एपिसोडमधील एक गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड खटकली आहे. माझ्याबद्दल लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण… माधुरीनं केला रानबाजरमधील भूमिकेचा खुलासा त्याचं झालं असं की बॉलिवूडच्या हिंदी चित्रपट जुग जुग जिओचे कलाकार देखील या शोमध्ये प्रमोशन करण्यासाठी आले होते. कियारा अडवाणी, वरुण धवन, अनिल कपूर यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी शोमधील परिक्षक स्वप्निल जोशी त्यांच्यासोबत एकत्र बसल्याचं दिसून आलं. परंतु अशोक सराफ यांच्यासाठी आयोजित खास भागात मात्र तो त्याच्या परिक्षकाच्या खुर्चीत बसलेला दिसून आला होता.
अशोक सराफ यांच्यासारखे दिग्गज अभिनेते शोमध्ये येतात तेव्हा स्वप्निल जोशीनं त्या खुर्चीत बसणं योग्य नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर मराठी कार्यक्रमातच मराठी कलाकारांना एक आणि बॉलिवूड कलाकरांना एक अशी वेगळी वागणूक का दिली जाते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.