| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 5, 2022, 1:42 PM

‘देवमाणूस’ या मालिकेनं पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. दुसऱ्या पर्वातही मालिकेची चर्चा सुरू आहे. दुसरं पर्व सुरू झालं तेव्हा प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. परंतु हळुहळू मालिका जोर पकडताना दिसतेय.

 

devmanus
मुंबई: ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत होते. त्यांच्या मागणीनुसार मालिकेचं दुसरं पर्व आलं आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. मालिकेत आणखी एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे.
कंगणी कंगणी, चिमण्या बाईला… जामकरची हट के स्टाइल चर्चेत
मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अभिनेते मिलिंद शिंदे यांनी एन्ट्री केल्यानंतर मालिकेनं पुन्हा एकदा जोर पडकला आहे. मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कथानकानं वेग पकडला आहे. मालिकेत नेमकं काय होणार याचं उत्तर प्रेक्षकांना मिळत नाहीए. त्यातच आणखी एका पात्राच्या एन्ट्रीनं मालिकेत वेगळा ट्वीस्ट येणार असं म्हटलं जात आहे.

मार्तंड जामकर याच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्नेहल शिदम साकरत आहे. नुकतीच तिची मालिकेत एन्ट्री झाल्याचं प्रेक्षकांना पाहिलंय. स्नेहलच्या एन्ट्रीनं मालिकेत नेमका काय ट्वीस्ट येणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण एक वेगळी चर्चा देखील आता सुरू झाली आहे.
जवळचे नातेवाईकचं मला रंगावरून आणि वजनावरून टोमणे मारायचे, स्नेहल शिदमनं सांगितला अनुभव
देवमाणूस २ सुरू झाल्यानंतर मालिकेत काही नाविन्य नसल्याचं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मालिकेत जामकरच्या एन्ट्रीनं प्रेक्षकांनी नाराजी दूर झाल्याचं दिसून आलं. परंतु सध्या सुरू असलेल्या कथानकावरून मालिकेचा शेवट जवळ आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मालिका निरोप घेणार का? असं चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : snehal shidam to play role in devmansu 2 martand jamkar wife
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here